मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने आणि त्या दमदार आवाजाने अवघ्या सिनेसृष्टीसह रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणारे दोन या क्षेत्रातील दोन मातब्बर आणि ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि विक्रम गोखले (Vikram Gokhale) लवकरच आपल्या समोर येणार आहे. 'एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटातून हे दोन्ही ज्येष्ठ कलाकार आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. हा पाहून प्रेक्षकांचे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे लक्ष लागले असेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
टीजर मध्ये विक्रम गोखले यांना आवाज देणारा अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज सा-यांचे लक्ष वेधून घेतो. टीजर वरुन अमिताभ हे विक्रम गोखले यांचे विद्यार्थी दाखवले आहेत असे दिसतेय आणि खूप वर्षांनतर त्या दोघांची भेट होणार आहे हेही कळतय. मात्र ही भेट होणार की नाही हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलय.
पाहा एबी आणि सीडी चा टीजर:
या टीजर मध्ये वृद्धत्वानंतर येणारे अनुभव ही दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटातून प्रथमच आणि विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चनही ही जोडी पाहायला मिळणार असून सर्वांची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे.
मिलिंद लेले यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अक्षय बरदापूरकर, अभयानंद सिंह, अरविंद रेड्डी, कृष्णा परसोद आणि पीयूष सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 13 मार्च ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.