Kangana Ranaut & Karan Johar (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या अभियानासोबत बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक गोष्टींवर ती खुलेपणाने आपले मत मांडते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) बॉलिवूडमधील नेपोटिज्म, इनसायडर्स आणि आऊटसायडर्स हे मुद्दे पुन्हा एकदा वर आले. दरम्यान कंगना रनौत हिने करण जोहर (Karan Johar) 'चित्रपट माफिया' (Movie Mafia) असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी तिने करण जोहर सहित अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांकडे बोट दाखवत नेपोटिज्मचा मुद्दा अधोरेखित केला होता. आता मात्र तिने करण जोहर याच्यावर टिकास्त्र सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे.

कंगना हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "करण जोहर चित्रपट माफियांचा प्रमुख आहे. इतकंच नाही तर अनेकांचे आयुष्य उद्धवस्त करुन तो मुक्तपणे फिरत आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. येथे आम्हा लोकांना काही आशा आहे का? हे सगळं मिटल्यानंतर तो आणि त्याची गँग माझ्याकडे येईल." (कंंगना रनौत म्हणते, बॉलिवूड माफिया पेक्षाही मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, राम कदम यांंना उत्तर देत केलेलंं ट्विट वाचा)

 Kangana Ranaut Tweet:

अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर खूपच अॅक्टीव्ह असते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना सुरुवातीपासूनच आपले मत रोकठोकपणे मांडत आली आहे. त्यामुळे कंगनाच्या फॉलोअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. अलिकडेच कंगनाने ड्रग्स पार्टीवरुन आपले मत मांडले. ड्रग्स कनेक्शन असणाऱ्यांची अनेक नावे माहित असल्याचे कंगनाने म्हटले होते. त्यावर भाजप नेता राम कदम यांनी कंगना रनौत हिच्या सुरक्षेची मागणी केली होती.