Kangana Ranaut’s Followers: ट्विटरचे फॉलोअर्स कमी होताना पाहून चिंतेत असलेल्या कंगना रनौत ने सोशल मिडियावर चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न
कंगना रनौत (Photo Credits-Facebook)

आपल्या दमदार अभिनयामुळे आणि सडेतोड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतला सध्या एक वेगळीच चिंता सतावत आहे. ती म्हणजे कंगनाचे ट्विटरवरचे फॉलोअर्स दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. याचे कारण अद्याप तिलाही समजू शकले नाही आहे. ती या संबंधी प्रयत्न करत असून यामागचे खरे कारण काय हे शोधून काढण्यासाठी तिने ट्विटद्वारे नेटक-यांची मदत मागितली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नेपोटिजम विरोधात बंड पुकारलेली कंगनाला अनेक लोक पसंत करत आहेत. मात्र असे असताना देखील फॉलोअर्स का कमी होतायत असा प्रश्न कंगनाला पडला आहे.

कंगना रनौत च्या एका चाहत्याने ट्विटर तिला तिचे फॉलोअर्स कमी होत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कंगनाने त्याला उत्तर देत ‘मी ही तुमच्याशी सहमत आहे की माझे फॉलोअर्स कमी होत आहे. मी सुद्धा नोटिस केले आहे की माझे प्रत्येक दिवशी 40 ते 50 हजार फॉलोअर्स कमी होत आहेत.’

हेदेखील वाचा- कंंगना रनौत म्हणते, बॉलिवूड माफिया पेक्षाही मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, राम कदम यांंना उत्तर देत केलेलंं ट्विट वाचा

‘मी येथे खूप नवीन असून हे कस काम करतं याबाबत मला माहिती दया. हे सर्व कशामुळे होत आहे कोणाला काही माहिती आहे का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यानंतर कंगनाने ट्विटमध्ये ट्विटर इंडिया ला टॅग केले आहे.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या नावाचा उल्लेख करत नेपोटिज्मचा (Nepotism) मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला होता. दरम्यान, "मी केलेले दावे सिद्ध करु शकले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करेन," असे मोठे वक्तव्य कंगनाने आता केले आहे. सध्या कंगना तिच्या मूळ गावी मनाली मध्ये असल्याचे रिपल्बिक मीडियाशी बोलताना तिने सांगितले. तसंच मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सन्मस जारी करण्यात आला असून प्रश्न उत्तरांसाठी तयार असल्याचेही कंगनाने स्पष्ट केले आहे.