Kangana Ranaut & Hrithik Roshan (Photo Credits: Instagram)

क्रुझ ड्रग पार्टी (Cruise Drug Party) प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबी (NCB) ने अटक केली आहे. आज कोर्ट यावर आपला निर्णय देणार आहे. या प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुख खान (Shahrukh Khan) ला पाठिंबा दर्शवता दिसत आहेत. यातच आता अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) ने पोस्ट करत आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. परंतु, ऋतिकच्या या पोस्टनंतर कंगना रनौत (Kangana Ranaut) ने सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला आहे. (Aryan Khan Arrested: आर्यन खानला अटक केल्यांनतर Shah Rukh Khan ला भेटण्यासाठी Salman Khan पोहोचला मन्नतवर, See Photo)

यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, "तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आता सर्व माफिया पप्पू आर्यनच्या बचावासाठी पुढे आले आहेत. आपण सर्वच चूका करतो पण त्याचा गौरव करु नये. मला आशा आहे की, यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या परिणामांची जाणीव होईल. हा त्याला पुढे वाढवण्यात आणि मोठे करण्यात मदत करणार. जेव्हा कोणी असुरक्षित असतं तेव्हा त्याबद्दल गॉसिप करणं चुकीचं आहे. परंतु, अपराध्याला त्याच्या चुकीचं जाणीव न करुन देणं त्याहूनही चुकीचं आहे." (Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा काय म्हणाला)

कंगना रनौत ची पोस्ट (Image Credit: Instagram)

दरम्यान, ऋतिक ने आपल्या पोस्टमधून आर्यनला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच हा कठीण काळ तुला चांगला व्यक्ती म्हणून घडवण्यास मदत करेल, असेही त्याने म्हटले आहे.