बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिचा 24 नोव्हेंबरला ‘थलाइवी’ (Thalaivi) या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि पोस्टर प्रदर्शित झाले. हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (Former Chief Minister Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सुप्रसिद्ध दिग्दर्शक ए. एल. विजय यांनी केले आहे. तमिळमध्ये या चित्रपटाचे नाव 'थलाइवी' आणि हिंदीमध्ये 'जया' असे ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा - जयललिता यांचा बायोपिक 'थलाइवी'चा फस्ट लुक आणि टीझर प्रदर्शित (Watch Video)
जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने 'प्रोस्थेटिक मेकअप'चा आधार घेतला आहे. तर 6 किलो वजन वाढवले आहे. तसेच जयललिताप्रमाणे दिसण्यासाठी कंगनाने पौष्टिक आहारासोबतच हार्मोन्सच्या गोळ्याही घेतल्या. मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने याबाबत खुलासा केला आहे. यावेळी कंगनाने सांगितले की, 'जयललिता यांच्या सारखे दिसण्यासाठी माझ्या शरीररचनेत काही बदल करावे लागले. जयललिता या उत्तम नृत्यांगना असल्याने यांची शरीरयष्टी कमालीचे सुंदर होती. परंतु, एका दुर्घटनेनंतर त्यांचे वजन खूपच वाढले. त्यांची भूमिका साकारण्यासाठी मी सकर आहारासह हार्मोन्सच्या गोळ्याही घेतल्या.
हेही वाचा - रिंकू राजगुरुच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटो पाहून चाहते झाले घायाळ; पाहा खास फोटो
‘थलाइवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या 3 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी रुपये मानधन स्वीकारले आहे. येत्या 26 जून 2020 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'थलाइवी' चित्रपटात तमिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांची भूमिका अरविंद स्वामी साकारणार आहेत. एमजीआर आणि जयललिता यांनी 28 सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले आहे.