रिंकू राजगुरुच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटो पाहून चाहते झाले घायाळ; पाहा खास फोटो
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असते. रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे.
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असते. रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. मराठमोळ्या अंदाजातील रिंकूचे हे फोटो अगदी बॉलिवूड अभिनेत्र्यांनाही लाजवतील असे आहेत.
सैराट चित्रपटानंतर रिंकूच्या फॅन फॉलवर्समध्ये वाढ झाली आहे. रिंकूने शेअर केलेल्या फोटोंना चाहते नेहमीचं भरभरून प्रतिसाद देत असतात. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने साडी नेसली असून काही फोटोंमध्ये तिचे आई-वडील आणि भाऊही आहेत. (हेही वाचा - बॉलिवूड कपल रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकाने केला 'हा' मोठा खुलासा)
सैराट चित्रपटात रिंकूने आर्चीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर आर्चीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. सैराटनंतर रिंकूने 'कागर' चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. या चित्रपटालाही मोठे यश मिळाले. या चित्रपटात रिंकूने एका राजकारणी मुलीची भूमिका साकारली. लवकरचं रिंकूचा 'मेकअप' हा सिनेमा येणार आहे. या चित्रपटातही रिंकू मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
रिंकू सध्या एक हिंदी वेब सीरिज करत असल्याची माहिती हाती आली आहे. एका बड्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत ती काम करत आहे. या वेब सीरिजचे चित्रीकरण माटुंग्याच्या एका चाळीमध्ये सुरू आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताही असणार आहे. अद्याप या वेब सीरिजचे नाव गुलदस्त्यात आहे. मात्र, या वेब सीरिजचे शूटिंग जोरात सुरू आहे. यात रिंकू चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या एका मुलीची भूमिका साकारणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2019 01:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

