Kangana Ranaut On Animal: कंगना रनौतचीही 'अ‍ॅनिमल'वर टिका, म्हणाली,
Kangana Ranaut (PC - Instagram)

'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असताना दुसरीकडे मात्र या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यानंतर कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) या सिनेमावर निशाणा साधला आहे. महिलांची मारहाण पाहायला सिनेप्रेक्षकांना आवडते असे या चित्रपटाबद्दल कंगनाने म्हटले आहे. या सिनेमांत एका महिलेला बूट चाटायला लावली जातात. S_X ऑब्जेक्ट प्रेक्षकांना आवडतं असेही तीने म्हटले आहे. (हेही वाचा - Javed Akhtar And Animal Movie: अ‍ॅनिमल चित्रपटातील संवादावरुन जावेद अख्तर आणि निर्मात्यांमध्ये वाद, निर्मात्यांनी ट्वीटर पोस्टमधून केला खुलासा)

पाहा कंगनाची पोस्ट-

कंगनाच्या एका चाहत्याने ट्वीट केलं आहे की,"कंगना रनौतचा 'तेजस हा उत्कृष्ट सिनेमा आहे. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कुठे कमी पडला हे मला ठाऊक नाही. करण जोहरसारखी मंडळी तिचं करिअर संपवायचा प्रयत्न करत आहेत. सर्वांनी हा सिनेमा नक्की पाहायला हवा". कंगना रनौतने या ट्वीटवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की,"माझ्या सिनेमांसाठीची पेड नकारात्मकता जबरदस्त आहे. मी आजवर खूप संघर्ष केला आहे. पण प्रेक्षकांना महिलांची मारहाण करणारे सिनेमे पाहायला जास्त आवडतं.

'अ‍ॅनिमल' या सिनेमात रणबीरसह बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ति डिमरी आणि शक्ति कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे.