Kangana Ranaut: आर माधवन आणि कंगना रनौत पुन्हा एकत्र, 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' नंतर नव्या चित्रपटावर काम सुरु

एकामागून एक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या कंगना रनौत (Kangna Ranaut) आता पु्न्हा एकदा आर. माधवन (R. Madhavan) सोबत चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' (Tanu Weds Manu Returns) या सुपरहिट चित्रपटातील जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.  कंगना रनौतने  इंस्टाग्राम स्टोरीवर आर माधवनसोबतचा तिचा सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीसोबत तिने कॅप्शनही लिहिले आहे. माझ्या आवडत्या आर माधवनसोबत आणखी एका उत्तम स्क्रिप्टसह परत येत आहे, असे कंगनाने म्हटले.  (हेही वाचा - Kangana Ranaut On Animal: कंगना रनौतचीही 'अ‍ॅनिमल'वर टिका, म्हणाली, "महिलांची मारहाण पाहायला सिनेप्रेक्षकांना आवडते")

पाहा फोटो  -

Kangana Ranaut : सलग फ्लॉप देणाऱ्या कंगनाने आता हुकुमाचा एक्का  काढला; 'या' अभिनेत्यासोबत पुन्हा झळकणार

कंगनाने एक फोटो शेअर केला असून त्यात ती काही लोकांसोबत बसलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये  तिने किती छान टीम आहे, असे म्हटले.  कंगनाच्या या स्टोरीवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कंगना रनौत आता माधवनचे करियर खराब करेल, माधवन जी कंगनापासून अंतर ठेवा, अन्यथा ती तुमचेही करिअर खराब करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असेही एका युजरने म्हटले.

कंगनाने याआधी आर. माधवनसोबत 'तनू वेड्स मनू' आणि त्यानंतर त्याचा सिक्वेल 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'मध्ये एकत्र काम केले आहे.  सध्या कंगना तिच्या आगामी 'एमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी आणि पुपुल जयकर हे देखील दिसणार आहेत.