Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) मुंबई महानगरपालिके विरुद्धची याचिका मागे घेण्यास तयार झाली आहे. खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामाच्या तोडफोड प्रकरणी कंगना ही याचिका बॉम्बे हायकोर्टात (Bombay High Court) दाखल केली होती. आज या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान याचिका मागे घेत असल्याचे कंगनाच्या वकीलांनी  सांगितले. फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी कंगना रनौत आता बीएमसीमध्ये अर्ज दाखल करणार आहे. या अर्जावर बीएमसीने (BMC) चार आठवड्यांच्या आत उत्तर द्यावे आणि तोपर्यंत बांधकाम तोडफोड स्थगित करण्याचे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले आहेत. (Kangana Ranaut Property Demolition Case: कंगना रनौत हिच्या प्रॉपर्टीवरील तोडक कारवाई बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा BMC ला झटका)

कंगनाने केलेला अर्ज रद्द झाल्यास त्यावर अपील करण्यासाठी तिच्याकडे 2 आठवड्यांचा कालावधी आहे. यापूर्वी कंगना रनौतच्या पाली हिल येथील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकामाविरुद्ध बीएमसीने तोडक कारवाई केली होती. त्यानंतर कंगनाच्या मुंबईतील खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध कंगनाला नोटीस बजावण्यात आली.

Bar & Bench Tweet:

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या ऑफिसपेक्षा बंगल्यात अधिक नियमांचे उल्लंघन झाले आहे. मुंबईमधील खार येथील 16 नं. रोडवर स्थित असलेल्या DB Breeze या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहते. या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट्स आहेत. 797 चौ.फूट, 711, चौ. फूट, 459 चौ. फूट असे या फ्लॅट्सचे क्षेत्रफळ आहे. हे तिन्ही फ्लॅट्स 8 मार्च 2013 मध्ये कंगनाच्या नावावर रजिस्टर झाले होते.

कंगनाने फ्लॅट विकत घेतल्याच्या 5 वर्षानंतर म्हणजेच 13 मार्च 2018 मध्ये या फ्लॅटमधील अनधिकृत बांधकामाची तक्रार बीएमसीकडे आली होती. मात्र 2020 मध्ये बीएमसीने यावर कारवाई केली. यामध्ये 2 कोटीचे नुकसान झाले असून त्याची भरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी करणारी याचिका कंगनाने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.