लग्नापूर्वीच अभिनेत्री कल्की कोचलिन होणार आई, नवजात बाळासंदर्भात केला नवा खुलासा
Kalki Koechlin (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेत्री कल्की कोचलिन (Kalki Koechlin) चित्रपटात नाही तर खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. तक कल्कि पाच महिन्यांची गर्भवती असून तिने होणाऱ्या नवजात बालकाबद्दल एक नवा खुलासा केला आहे. कल्कि हिने एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, होणाऱ्या बाळाला मला पाण्यात जन्म (Water Birth) द्यायचा असून त्याबद्दल मी फार उत्सुक आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासूम माझ्या दैनंदिन जीवनात फार बदल झाला आहे.

हिंदुस्तान टाईम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्कि हिला गर्भवती असल्याबाबत विचारले असता तिने मोकळेपणाने याबाबत सांगितले आहे. तसेच आई होण्याचा आनंद होत असून येणाऱ्या नवजात बाळामुळे व्यक्तीच्या आतमध्ये एक नवा उत्साह असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. एवढेच नाही नवजात बाळाचे नाव काय असणार याचा विचार सुद्धा कल्कि हिने केला आहे.(अभिनेत्री Amy Jackson ने दिला एका गोंडस मुलाला जन्म, सोशल मिडियावर शेअर केला चिमुकल्याचा पहिला फोटो)

 

View this post on Instagram

 

It's always a Sunday when I'm with my favourite caveman🥰

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

तर कल्कि हिच्या ब्रॉयफ्रेंडचे नाव Guy Hershberg असून तो पेशाने क्लासिकल पियॉनिस्ट आहे. हर्शबर्ग सध्या मुंबईत राहत आहे. सुत्रांच्या मते हर्शबर्ग जनावरांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओ संबंधित जोडला गेला आहे. गेल्या महिन्यातच कल्कि हिने हर्शबर्ग याच्यासोबत एक फोटो शेअर केला असून दोघे समुद्राच्या येथे मजामस्ती करताना दिसून येत आहेत.

तत्पूर्वी कल्कि हिचे नाते हर्शबर्ग याच्यासोबत सुरु होण्यापूर्वी 2011 मध्ये तिने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत लग्न केले होते. या दोघांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केल्यानंतर विवाहबंधनात अडकले होते. मात्र अनुराग आणि कल्कि या दोघांचे लग्न बराच काळ टिकू न शकल्याने ते विभक्त झाले. आता कल्कि आणि अनुराग फक्त एकमेकांचे मित्रमैत्रीण असल्याचे सांगत आहेत.