Kajal Aggarwal Engaged? अभिनेत्री काजल अग्रवाल हिने व्यवसायिकाशी साखरपुडा केल्याच्या चर्चा, वाचा सविस्तर
Kajal Aggarwal (Photo Credits: Instagram)

Kajal Aggarwal Engagement: तामिळ आणि तेलगू चित्रपटांमधील कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ने गौतम नावाच्या व्यावसायिकाशी गपचुप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडिया वर होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये जेव्हा काजलने सांगितले आहे की लवकरच तिचे लग्न होणार आहे, तेव्हापासुन नक्की कोणाशी काजल लग्न करणार, तिचा बॉयफ्रेंड किंंबहुना होणारा नवरा कोण आही याविषयी फॅन्स मध्ये उत्सुकता होती आता या मध्ये या साखरपुड्याच्या चर्चांची भर पडली आहे. फिल्मी बीट च्या वृत्तानुसार, अलिकडेच एका अगदी घरगुती सोहळ्यात काजल ने गौतम सोबत साखरपुडा उरकला होता.

काजल अग्रवाल हिच्या साखरपुड्यासाठी प्रसिद्ध तेलगू अभिनेता बेलामकोंडा श्रीनिवास याने सुद्धा हजेरी लावली होती असे म्हंटले जात आहे. काजल लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या या खास क्षणा विषयी सांंगणार असल्याचे सुद्धा माध्यमांंचे सुत्र सांगत आहेत मात्र अजुन तरी काजल, तिचे कुटुंब किंवा तिच्या जवळच्या मित्रांपैकी कोणीही अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.

काजल अग्रवाल Instagram

 

View this post on Instagram

 

@nkdivya 🤎

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

दरम्यान, फीट अप विथ द स्टार्स तेलगू या लक्ष्मी मंचूच्या चॅट शोमध्ये काजल अग्रवाल हिने आपण 2020  मध्ये लग्न करणार आहोत असे सांंगताना आपल्यासाठी हवा असणार्‍या वराची वैशिष्ट्य सुद्धा सांगितली होती, काजल ला एका Possesive, काळजी करणार्‍या आणि आध्यात्मिक विचाराच्या तरुणाशी लग्न करायचे असल्याचे तिने सांगितले होते. कामाच्या बाबत सांंगायचे झाल्यास सध्या मोसागल्लू, आचार्य, मुंबई सागा, हे सिमिनिका असे सिनेमे काजल कडे आहेत.