Singer Bhuban Badyakar (PC - Instagram)

'कच्छा बदाम' (Kacha Badam) गायक भुबन बड्याकार (Bhuban Badyakar) त्यांच्या नवीन गाण्यासोबत हजर आहे. सोशल मीडियावर आधीच व्हायरल झालेले हे गाणे लोकांना खूपचं आवडलं. बहुतेकांना या गाण्याचे बोल समजले नसतील. परंतु चाहत्यांनी त्याच्या तालावर नाचण्यास सुरुवात केली आहे. या गाण्यावर अनेक रील्स तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे या गाण्याचा संबंध काही दिवसांपूर्वी झालेल्या त्याच्या अपघाताशी आहे. ज्यानंतर ते बरे होऊन घरी परतले आहेत.

होय, भुबन बद्यकर रस्ता अपघातात जखमी झाले होते. वास्तविक, ते कार शिकत होते आणि त्याचवेळी त्यांचा अपघात झाला. भुबन यांला तातडीने जवळच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तानुसार, भुबन बद्यकर यांच्या शरीराच्या अनेक भागात जखमा झाल्या आहेत. नुकतीचं त्यांनी सेकंड हँड कार खरेदी केली, जी ते चालवायला शिकत होते. (वाचा - Deepika Padukone चा एअरपोर्टवरील लूक पाहून चाहते झाले हैराण; म्हणाले, Zomato Girl)

नवीन गाण्याचे बोल

बरे झाल्यानंतर लवकरच भुबन यांनी एक नवीन गाणे तयार केले. त्याच्या नवीन गाण्याचे नाव अमर नोटुन गारी आहे. ज्याचा अर्थ 'माझे नवीन वाहन' आहे. अपघात आणि गाण्याबद्दल भुबन बद्यकर म्हणाले, "मी सेकंड हँड कार खरेदी केली आहे. मी ती चालवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती एका भिंतीवर आदळली. मला दुखापत झाली, पण आता मी पूर्णपणे बरा आहे. त्यानंतर मी आता नवीन कार आणि अपघाताबद्दल नवीन गाणे तयार केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhuban Badyakar (@bhuban_badyakar)

पश्चिम बंगालमधील एका गावात शेंगदाणे विकणारे भुबन बद्यकर त्यांच्या कच्छा बदाम या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत या गाण्यावर रिल तयार झाली. अधिकाधिक ग्राहक त्याच्याकडे यावेत म्हणून ते शेंगदाणे विकण्यासाठी कच्चा बदाम गाणं गात असतं. त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि काही दिवसांतच तो व्हायरल झाला. त्यानंतर ते एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आले.