Deepika Padukone चा एअरपोर्टवरील लूक पाहून चाहते झाले हैराण; म्हणाले, Zomato Girl
Deepika Padukone look at the airport (PC - Instagram)

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या कामामुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच, दीपिकाचा गहराईयान (Gehraiyaan) हा चित्रपट Amazon Prime वर आला आहे, ज्यामध्ये तिच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. यासोबतच तब्बल 8 वर्षांनंतर ती पुन्हा एकदा शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत काम करणार आहे. 'पठाण' (Pathaan) चित्रपटाचे शूटिंग आता स्पेनमध्ये होणार आहे, ज्यासाठी किंग खान, दीपिका आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांनी उड्डाण केले आहे. मात्र यावेळी अभिनेत्रीचा लूक पाहून लोकांनी डोक्याला हात लावला आहे. दीपिकाच्या या लूकमुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

दीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान तिने लाल टर्टल नेक टी-शर्ट आणि लेदर पॅंट घातली होती. तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यादरम्यान तिने कॅप देखील घातली होती. अनेकांनी दीपिकाच्या वाईट फॅशन सेन्सचे कारण रणवीर सिंग असल्याचं सांगितले आहे. (वाचा - अभिनेत्री Sonakshi Sinha वर लाखो रुपयांचा फसवणुकीचा आरोप; न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट)

दीपिका पदुकोण 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना झाली आहे. मात्र, तिने विमानतळावर जाताना जे परिधान केलं होते ते सोशल मीडिया यूजर्सना आवडले नाही. त्यानंतर त्यांनी दीपिकाची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हायरल भयानीने दीपिकाचा एअरपोर्ट लूक आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'ही रणवीर सिंग बनली आहे.' दुसऱ्याने लिहिले, 'आता रणवीर सिंगचा प्रभाव तर पडणारचं होता.' दुसर्‍याने लिहिले - 'तिची स्टायलिस्ट कोण आहे?' दुसर्‍याने लिहिले, 'झोमॅटो गर्ल.' सध्या सोशल मीडिया वापरकर्ते दीपिकाच्या लूकवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.