कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या जजमेंटल है क्या (Judgemental Hai Kya) या सिनेमाला आता प्रदर्शनाच्या नंतरही वादापासून सुटका मिळत नाहीये. यावेळेस हा नवा सिनेमाच्या पोस्टर वरून झाल्याचे समजत आहे. युरोपियन फोटोग्राफर फ्लोरा बोरसी (Flora Borsi) यांनी पोस्टर मध्ये वापरण्यात आलेला कंगनाचा फोटो हा आपण काढलेल्या फोटोशी साधर्म्य असल्याचे म्हणत निर्मात्यांवर चोरीचा आरोप लगावला आहे. बोरसी यांनी फेसबुकवर एक पोस्ट मध्ये सिनेमाच्या निर्मात्यांनी आपल्या परवानगी शिवाय आपले काम तसेच्या तसे कॉपी केले आहे असे लिहिले आहे, पोस्टसोबतच त्यांनी पोस्टर व आपण काढलेला फोटो दोन्ही शेअर केले आहेत.
पहा जजमेंटल है क्या चे पोस्टर
कंगना आणि राजकुमार यांचा हा फोटो पाहिल्यावर फ्लोरा बोरसी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत, ज्यामध्ये या दोन्ही फोटोंमध्ये तुम्हला काही समानता दिसत आहे का असा सवाल केला आहे. यापुढे बोरसी यांनी हे बॉलिवूडच्या जजमेंटल है क्या सिनेमाचे पोस्टर आहे ज्यात माझे काम न विचारता तंतोतंत चोरले आहे, एका मोठ्या कंपनीत फ्रीलान्सिंग करणाऱ्या आर्टिस्टचे काम चोरणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. असेही म्हंटले आहे. याशिवाय ट्विटर वर सुद्धा बोरसी यांनी पोस्टर शेअर करत या प्रकाराची माहिती दिली. ज्यामध्ये "हे पोस्टर पाहून मला माझे काम आठवत आहे.. किंवा नाही हे माझेच काम कोणीतरी चोरले आहे" असे म्हंटले होते.
आता पहा फ्लोरा बोरसी यांची फेसबुक पोस्ट
हे ही वाचा- व्हायरल होत आहे कंगना राणावतचा 'तो' सेमीन्यूड फोटो; पहलाज निहलानी यांच्या फोटोशूटचा असल्याचा दावा
oh yeah, this image somehow reminds me of.. oh wait. looks like totally my work! 😕😕😕😕 https://t.co/6XhiK317Re
— Flora Borsi (@FloraBorsi) July 29, 2019
यापूर्वी मेंटल है क्या या नावावरून झालेला गोंधळ , पाठोपाठ कंगना आणि पत्रकाराच्या वादामुळे जजमेंटल है क्या सिनेमा वारंवार अडचणीत येत होता. अलीकडेच प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने जवळपास 22 कोटी इतकीच कमाई केली आहे.