व्हायरल होत आहे कंगना राणावतचा 'तो' सेमीन्यूड फोटो; पहलाज निहलानी यांच्या फोटोशूटचा असल्याचा दावा
कंगना राणावत (Photo Credit : Twitter)

कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. चित्रपटांचे यश, वादग्रस्त वक्त्यव्य यांमुळे तर ती नेहमीच प्रकाशझोतात असते. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये, पहलाज निहलानी यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी मला एका पारदर्शक रोबमध्ये, अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते असा खुलासा केला होता. यामुळे प्रचंड गदारोळ माजला होता. त्यानंतर ‘सर्वांशी पंगे घे पण माझ्याशी नको’ असे पहलाज निहलानी यांनी कंगनाला तंबी दिली होती. मात्र आता इंटरनेटवर कंगनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये कंगना सेमी न्यूड पोझमध्ये दिसून येत आहे. या फोटोच्या बाजूला पहलाज यांच्या चित्रपटाचे नावही स्पष्ट दिसत आहे.

पहलाज निहलानी यांनी त्यावळी या फोटोशूटवर दीड कोट रुपये खर्च केले होते. या शूटमुळेच कंगनाला ‘गँगस्टर’ हा चित्रपट मिळाला, त्यानंतर तिने माझा चित्रपट करण्यास टाळाटाळ केली. असे निहलानी म्हणाले होते. मात्र त्यांनी 'अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट' या गोष्टीचे खंडन केले होते. सध्या वा-याच्या वेगाने व्हायरल होत असलेला कंगनाचा हा सेमी न्यूड फोटो पहलाज यांच्या चित्रपटासाठी केलेल्या फोटोशूटचाच असल्याचा दावा तूर्तास केला जातोय. हा फोटो फेक आहे की, खरोखरच पहलाज यांनी आपल्या चित्रपटासाठी केलेल्या फोटोशूटचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा: कंगना ठरली बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; जयललिता यांच्या बायोपिकसाठी घेतले तब्बल 24 कोटी)

दरम्यान, कंगनाने अनुराग बसू यांचा ‘इमली’ हा चित्रपट तारखांमुळे सोडवा लागल्याचे वृत्त आहे. मात्र जयललिता यांच्या बायोपिकमुळे कंगना चांगलीच खुश असलेली दिसून येत आहे. या चित्रपटासाठी कंगनाने तब्बल 24 कोटी मानधन घेतले आहे.