Mumbai Saga Teaser: जॉन अब्राहम याचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा' चा धमाकेदार टीजर झाला प्रदर्शित, Watch Video
Mumbai Saga Official Teaser (Photo Credits: YouTube)

'शूटआऊट अॅट वडाळा' या चित्रपटानंतर अभिनेता जॉन अब्राहम(John Abraham) पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा' (Mumbai Saga) चा टीजर प्रदर्शित झाला आहे. हा टीजर पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या चित्रपटातून पहिल्यांदाच जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. जॉन आणि इम्रान शिवाय काजल अग्रवाल (Kajal Aggarwal), सुनील शेट्टी (Sunil Shetty) या चित्रपटात दिसणार आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटात इम्रान हाश्मी हा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

जॉन अब्राहमने 'मुंबई सागा' चा टीजर सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा टीजर शेअर करून 'जेव्हा बॉम्बे मुंबई नव्हते आणि हिंसा रस्त्यांवर राज्य करत होती. तयार व्हा अशाच एका कथेसाठी' असे कॅप्शन त्याने दिले आहे.हेदेखील वाचा- Bhoot Police Poster: सैफ अली खान, अर्जून कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'भूत पोलिस' चित्रपटाचे पोस्टर आले समोर, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित

पाहा टीजर

जेव्हा बॉम्बेच्या रस्त्यांवर बंदूकीचे राज्य होते अशा एक डायलॉग तुम्हाला या टीजरच्या सुरुवातीला ऐकायला मिळेल. यात गँगस्टर, गोळीबार, एन्काउंटर यांसारख्या घटना या टीजरमध्ये पाहायला मिळत आहेत.

हा चित्रपट येत्या 19 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. टीजर मधून या चित्रपटात जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी सह महेश मांजरेकर, रोहित रॉय, प्रतीक बब्बर देखील दिसत आहेत. त्यामुळे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची सर्वच प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.

बॉक्स ऑफिसवर मुंबई सागाची टक्कर अर्जुन कपूर आणि परिणिती चोपड़ा चा चित्रपट 'संदिप और पिंकी फरार' या चित्रपटाशी होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो हे येणा-या काही दिवसांत कळेल.