Bhoot Police Poster (Photo Credits: Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला सैफ अली खान (Saif Ali Khan), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) स्टारर 'भूत पोलिस' (Bhoot Police) चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि अर्जूनसह जैकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), यामी गौतम (Yami Gautam) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट (Horror Comedy Movie) असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर 2020 मध्ये या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट रखडल्याने याचे शूटिंग उशिराने सुरु झाले. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आहे.

भूत पोलिस हा चित्रपट 10 सप्टेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पवन किर्पलानी (Pavan Kirpalani) हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. रमेश तोरानी आणि अक्षय पूरी या चित्रपटाचे निर्माते आहेत.हेदेखील वाचा- Bhoot Police: जैकलीन फर्नांडिस ने सोशल मिडियावर शेअर केला 'भूत पोलिस' या आगामी चित्रपटातील तिचा ग्लॅमरस लूक

भूत पोलिसचे पोस्टर पाहिलात तर यात तुम्हाला एका डोंगरावर चार जण उभे आहेत असे दिसतील. अंधा-या रात्रीत एका मुलीच्या हातात चाबूक, दुसरीच्या हातात मशाल दिसत आहे. यातील एक जैकलीन आणि दुसरी यामी गौतम आहे. तर या दोघींच्या मध्ये अर्जुन कपूर आणि सैफ अली खान उभे आहेत. हा पाठमोरा फोटो असल्यामुळे या चौघांचा लूक या पोस्टरमध्ये दिसत नाहीय.

प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे पोस्टर बनविण्यात आले आहे. यात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अर्जुन कपूर आणि सैफ अली खान ही जोडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची या दोघांनी ऑनस्क्रिन पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.