Bhoot Police: जैकलीन फर्नांडिस ने सोशल मिडियावर शेअर केला 'भूत पोलिस' या आगामी चित्रपटातील तिचा ग्लॅमरस लूक
Jacqueline Bhoot Police Look (Photo Credits: instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज (Jacqueline Fernandez) आपल्या हॉट आणि सेक्सी लूक्समुळे स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिचे सोशल मिडियावरही बरेच फॉलोअर्स आहेत. फिटनेसच्या बाबतीत, स्टाईलच्या बाबतीत नेहमीच आग्रही असलेल्या जैकलीन ने नुकताच आपल्या आगामी चित्रपट भूत पोलीस (Bhoot Police) मधील तिचा ग्लॅमरस लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामधील तिचा हॉट लूक पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहेत. भूत पोलिस चित्रपट हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट (horror Comedy) असून या चित्रपटाचे शूटिंग मोठमोठ्या पर्वतांमध्ये याचे शूटिंग सुरु आहे. जैकलीन सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. डलहौजी मध्ये आपले शूटिंग शेडयूल संपल्यानंतर जैकलीन आपल्या अन्य कलाकारांसह आणि चालक दलासह धर्मशाळेत वेळ घालवत आहे.

या चित्रपटातील तिचा ग्लॅमरस लूक तिने सोशल मिडियावर शेअर केला असून या लूक चाहतेही प्रचंड पसंत करत आहे. या फोटोमध्ये जैकलीनने पांढरे शर्ट आणि काळी टोपीसह काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. या अवतारात ती आपला मेकअप करताना दिसत आहे. हेदेखील वाचा- Indoo Ki Jawani: कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'इंदू की जवानी' थिएटरमध्ये 'या' तारखीला होणार प्रदर्शित

हा फोटो शेअर करुन जैकलीनने त्या खाली, "धर्मशाळेहून बोनजोर. मार्स प्रेडोजो मला माहित नाही तुम्ही काय करत आहात, सवलीन कौर आणि शान बेबीज." असे लिहिले आहे.

जैकलीनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तर जैकलीन लवकरच रोहित शेट्टी च्या 'सर्कस' या चित्रपटात दिसेल. या चित्रपटात जैकलीन शिवाय रणवीर सिंह सुद्धा दिसेल. त्याचबरोबर जैकलीन टायगर श्रॉफसह अॅक्शन फिल्म 'बागी 4' मध्ये सुद्धा दिसणार आहे असे सांगण्यात येत आहे.