Indoo Ki Jawani: कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'इंदू की जवानी' थिएटरमध्ये 'या' तारखीला होणार प्रदर्शित
Kiara Advani (फोटो सौजन्य - Instagram)

Indoo Ki Jawani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि आदित्य सील स्टारर फिल्म इंदू की जवानी (Indoo Ki Jawani) लवकरचं रिलीज होणार आहे. खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे, तर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) लोक सध्या चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यास कमी पसंती देत आहेत. मात्र, अशात हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरिकांना सिनेमागृहात चित्रपट पाहता येणार आहे. कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊ शकतात. सध्याच चित्र पाहता निर्माते चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु, इंदू की जवानीच्या निर्मात्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 11 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. अबीर सेनगुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच टी-सीरिज, Emmay एंटरटेन्मेंट आणि इलेक्ट्रिक अॅपल्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (हेही वाचा -Radhe to Release in Cinemas: सलमान खान याचा 'राधे' सिनेमा OTT फ्लॅटफॉर्म वर नाही तर सिनेमागृहात 'या' दिवशी होणार रिलीज)

चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आधीपासूनच आल्या आहेत. याशिवाय हा चित्रपट 11 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मागील 6 महिन्यांपासून शूटिंगचे काम बंद पडल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यास वेळ लागला. इंदू की जवानी हा एक विनोदी चित्रपट आहे. महिलांवर लक्ष केंद्रित करणारा कियाराचा हा पहिला चित्रपट आहे.

या चित्रपटाबद्दल कियारा खूप उत्साही दिसत आहे. कियाराने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. याशिवाय ती ‘जुग जुग जिओ’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवनच्या सोबत दिसणार आहे. दरम्यान, 'इंदू की जवानी' ची निर्मिती निखिल अडवाणी, निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन करत आहेत. बंगाली लेखक-चित्रपट निर्माता आबिर सेनगुप्ता या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.