टीव्ही मालिकांपासून ते बॉलिवूड अशा दीर्घ पल्ल्यावर अभिनयाच्या माध्यमातून आपली छाप उमटवणारे अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi passes away) यांचे निधन झाले आहे. जावेद खान (Javed Khan Amrohi) यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लगान' (Lagaan) चित्रपटात साकारलेल्या राम सिंह या त्यांच्या भूमिकेचे जोरदार कौतुक झाले होते. सोशल मीडियावर सेलेब्स आणि चाहते जावेद खान अमरोही यांना श्रध्दांजली अर्पण करत आहेत. जावेद खान अमरोही यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
जावेद खान अमरोही यांचे 'अंदाज अपना अपना' आणि 'चक दे इंडिया', 'लगान' हे काही गाजलेले अलिकडील काळातील चित्रपट. या चित्रपटांतील भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जातात. याशिवाय जावेद खान अमरोही यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये अभिनयाचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. 'लगान' चित्रपटाचा अभिनेता अखिलेंद्र मिश्रा याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून मुंबईत जन्मलेल्या जावेद खान अमरोही यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. अखिलेंद्र मिश्रा यांनी जावेद खान अमरोही यांचा फोटो शेअर करत लिहिले, 'जावेद खान साहेबांना विनम्र श्रद्धांजली. सर्वोत्कृष्ट अभिनेता, ज्येष्ठ चित्रकार, EPTA चे सक्रिय सदस्य.' (हेही वाचा, Rakhi Sawant Emotional Video: राखी सावंत हिने प्रसारमाध्यमांसमोर फोडला हंबरडा; आईच्या निधनाचे दु:ख अनावर (पाहा व्हिडिओ))
ट्विट
बॉलीवुड फिल्मों में अपनी अदाकारी से लोगों का दिल जीतने वाले एक्टर जावेद खान अमरोही अब हमारे बीच नहीं रहे.#ATCard #JavedKhanAmrohi #Lagaan #RIP pic.twitter.com/cnjSU9DdvP
— AajTak (@aajtak) February 14, 2023
जावेद खान अमरोही यांनी 1973 साली 'जलते बदन' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर 'नूरी', 'पसंद अपनी अपनी', 'बाजार', 'रंग बिरंगी' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय कौशल्य दाखवले. जावेद खान अमरोही यांनी 'मिर्झा गालिब' या मालिकेसह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.