PM Narendra Modi Biopic पोस्टरवर 'गीतलेखक' म्हणून उल्लेख पाहून जावेद अख्तर आश्चर्यचकीत; ट्रोलर्सनीही दिला अख्तरांना सल्ला
PM Narendra Modi poster; Javed Akhtar (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'Narendra Modi Biopic'चा ट्रेलर नुकताच रीलिज करण्यात आला आहे. या ट्रेलरच्या पोस्टरमध्ये सिनेमाच्या टीमच्या नावाचा उल्लेख आहे. यात जावेर अख्तर (Javed Akhtar) यांच्या नावाचा उल्लेख 'गीतकार' म्हणून करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात आपण या सिनेमासाठी कोणतही गीतलेखन केलं नसल्याचं ट्वीट करत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. PM Narendra Modi Biopic Trailer: पंतप्रधान नरेंद्र मोदी बायोपिक ट्रेलरमध्ये RSS पासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक

 

जावेद अख्तर यांचं ट्विट

पोस्टरमध्ये गीतकारासमोर जावेद अख्तर, प्रसून जोशी, समीर, अभेंद्र कुमार उपाध्याय, पारी जी आणि लावराज यांचं नावदेखील लिहण्यात आलं आहे.

ट्रोलर्सच्या प्रतिक्रिया 

ट्विट 1

ट्विट 2

ट्विट 3 

ट्विट 4 

Narendra Modi Biopic या सिनेमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय झळकला आहे. हा सिनेमा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. उमंग कुमार हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वी 'मेरी कॉम', 'सरबजीत' यासारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.