अभिनेत्री तनुश्री दत्ता ने सुरु केलेल्या #MeToo चळवळीने 2018 मध्ये चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे अनेक अभिनेत्री, मॉडल यांनी समोर येऊन आपल्यावर झालेल्या कामादरम्यान किंवा काम मिळविण्यासाठी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची उघडपणे माहिती दिली. मात्र त्यावर गप्प बसलेली एक भारतीय मॉडल Paula हिने आपले मौन सोडले असून दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) वर गंभीर आरोप लावले आहेत. 'मी 17 वर्षांची असताना माझ्यावर साजिद खान काम देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला होता' अशा आशयाची पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केली आहे.
पाउला ने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'मी मी टू चळवळीदरम्यान गप्प राहिले कारण या इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नव्हता आणि मला माझ्या कुटूंबासाठी काम करणे जरुरीचे होते. मात्र आता माझे आईवडिल माझ्यासोबत नाही. म्हणून मी साजिद खान याच्याविरोधात बोलू शकते. मी 17 वर्षांची असताना त्यांनी माझा लैंगिक छळ केला होता.' #MeToo : लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप; दिग्दर्शक साजिद खान निलंबित
View this post on Instagram
🙏🏼 Before democracy dies and there is no freedom of speech anymore I thought I should speak !
तिने पुढे असेही सांगितले आहे की, 'त्यावेळी साजिद खान यांचा हाऊसफुल चित्रपट येणार होता. या चित्रपटात काम मिळविण्यासाठी मी त्यांच्याकडे गेली असता त्यांनी मला माझ्याशी अश्लील भाषेत संभाषण केले. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मला कपडे उतरविण्यासा सांगितले ज्यामुळे मला या चित्रपटात रोल मिळेल. देवालाच माहित असेल असे त्याने किती मुलींसोबत केले असेल.'
'मला हे सांगण्यासाठी कोणी पुढे केले नसून मला जाणीव झाली की ही गोष्ट समोर आली पाहिजे. तेव्हा मी लहान होती. मात्र आता मी गप्प नाही बसणार. साजिद खान ला जेल झाली पाहिजे.' अशी मागणीही पाउलाने केली आहे.