Sushant Singh Rajput Death Case Update: वांद्रे पोलिसांनी घेतला 15 जणांचा जबाब, अधिका-यांच्या हाती लागली सुशांत ने सही केलेल्या यश राज फिल्मच्या कराराची प्रत
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. यामुळे बॉलिवूडमधील घराणेशाही, वादविवाद यांसारख्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) आज सुशांत सिंह राजपूत व्यवस्थापकीय अधिका-यांचा जबाब नोंदवला. यात 15 जणांचा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मुंबईचे झोन 9 चे अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिषेक त्रिमुखे (DCP Zone 9 Abhishek Trimukhe) यांनी दिली आहे. यासोबतच सुशांत सिंह राजपूत याने यश राज फिल्म सोबत केलेल्या कराराची सही केलेली प्रत सापडली आहे.

सुशांत सिंह राजपूत सारख्या हरहुन्नरी, हुशार आणि बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देणारा कलाकार आत्महत्या करूच शकत नाही असेच त्याच्या कुटूंबियांचे तसेच त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. यामुळे सुशांतला नैराश्य आले होते का की काही वेगळं कारण आहे याबाबत पोलिस कसून तपास करत आहेत. याआधी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवती हिचा देखील जबाब नोंदविण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्या करण्यापासून वाचवू शकली असती अंकित लोखंडे? प्रोड्युसर संदीप सिंह याने लिहिली भावनात्मक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गढूळ झालेले वातावरण, राजकारण याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नेपोटिझम मुळे सुशांतला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले हा मुद्दा त्याच्या चाहत्यांनी उचलून धरल्यामुळे अनेक बॉलिवूडकरांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.