Shah Rukh Khan and Vicky Kaushal (Photo Credits: IIFA Awards 2024)

IIFA Awards 2024 on TV: लंडनमध्ये 2000 मध्ये सुरू झालेल्या आयफा अवॉर्ड्सला (IIFA Awards) यंदा 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचा आयफा अवॉर्ड्स 2024 (IIFA Awards 2024) सोहळा 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान अबुधाबीमध्ये आयोजित करण्यात आला होता. अबुधाबीमध्ये सलग तिसऱ्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमात आयफा उत्सवम 2024 (दक्षिण भारतीय चित्रपट उद्योग सेलिब्रेशन), आयफा पुरस्कार 2024 (बॉलीवूड आणि हिंदी चित्रपटांचे सेलिब्रेशन) आणि आयफा रॉक्स 2024 (बॉलीवूड संगीत आणि आयफा तांत्रिक पुरस्कार 2024 सेलिब्रेशन) असे तीन सोहळे पार पडले.

आता आयफा आणि झीने घोषणा केली की, आयफा पुरस्कार 2024 रविवार, 10 नोव्हेंबर 2024 रोजी झी टीव्हीवर प्रसारित केले जाणार आहेत. आयफा पुरस्कार 2024 च्या प्रसारणाची वेळ रात्री 8 वाजता आहे. नंतर हा कार्यक्रम पुनः टेलिकास्ट केला जाणार आहे. शाहरुख खान आणि बॉलिवूड सेलिब्रिटींव्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. दिग्दर्शक आणि निर्माते मणिरत्नम यांच्या उपस्थितीत अभिनेत्रीला, आयफा उत्सवम 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (हेही वाचा: 'जवान' चित्रपटासाठी Shahrukh Khan ने जिंकला IIFA अॅवार्ड, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला)

शाहरुख खान, विकी कौशल हा कार्यक्रम होस्ट करताना दिसले. तर रेखा, क्रिती सॅनन, शाहिद कपूर, प्रभुदेवा, अनन्या पांडे यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी मंचावर दमदार परफॉर्मन्स दिले.

यंदाच्या आयफामधील महत्वाचे पुरस्कार विजेते-

सर्वोत्कृष्ट चित्रपट: ॲनिमल

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: विधू विनोद चोप्रा (12 फेल)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे)

सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान (जवान)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (महिला): शबाना आझमी (रॉकी और रानी की लव्ह स्टोरी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (पुरुष): अनिल कपूर (ॲनिमल)

नकारात्मक भूमिका: बॉबी देओल (ॲनिमल)

संगीत दिग्दर्शन: प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केमसन, हर्षवर्धन, रामेश्वर (ॲनिमल)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): शिल्पा राव- चलेया (जवान)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): भूपिंदर बब्बल - अर्जन व्हॅली (ॲनिमल)

बेस्ट गीत: सिद्धार्थ-गरिमा, सतरंगा (ॲनिमल)

सर्वोत्कृष्ट कथा: रॉकी और रानी की लव्ह स्टोरी

सर्वोत्कृष्ट कथा (रूपांतरित): 12वी फेल

भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदान: जयंतीलाल गडा आणि हेमा मालिनी

दरम्यान, आयफा अवॉर्ड्स 2025 चे आयोजन राजस्थानच्या जयपूर येथे 7 मार्च ते 9 मार्च 2025 दरम्यान करण्यात आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री दिया कुमारी म्हणाल्या, जयपूरमध्ये आयफा अवॉर्ड शो आयोजित केल्याने राजस्थान पर्यटनाला नवीन उंची मिळेल आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार आणि चित्रपटसृष्टीमधील लोक तीन दिवस आमचे पाहुणे असतील आणि त्यांचे भव्य राजस्थानी परंपरेने स्वागत केले जाईल.