IIFA Awards (Photo Credits: Twitter)

हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय पुरस्कार समजला जाणारा ‘आयफा अवॉर्ड्स 2022’ (IIFA Awards 2022) हा  तीन दिवसीय कार्यक्रम यंदा दुबईमध्ये (Dubai) आयोजित केला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा 2 जून ते 4 जून या कालावधीत होणार आहे. आयफा अवॉर्ड्सची ही 22 वी आवृत्ती असेल, मात्र हा सोहळा 21व्यांदा आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी 2020 आणि 2021 मध्ये हा सोहळा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता. शेवटचा 2019 मध्ये मुंबई हा पुरस्कार सोहळा पार पडला होता.

युएईच्या राष्ट्रपतींच्या निधनानंतर 40 दिवसांचा ‘राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे याआधी अबुधाबीच्या येस आयलंडवर 20-21 मे रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, आता हा सोहळा 2-4 जून रोजी येस आयलंड अबुधाबी येथे होणार आहे. यावेळी 3 जून रोजी हा कार्यक्रम निर्माती फराह खान कुंदर आणि अभिनेता अपारशक्ती खुराना होस्ट करणार आहेत. यासह अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल 4 जूनला शो होस्ट करतील.

यंदा सलमान खान आयफासोबत आपले 20 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे यंदाचा सोहळा अभिनेत्यासाठीदेखील खास ठरणार आहे. त्याचबरोबर, या वेळी या पुरस्कारासाठी नऊ नव्या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा: जॅकलीन फर्नांडिसला आयफा पुरस्कारासाठी अबू धाबीला जाण्यास न्यायालयाने दिली परवानगी)

आयफा पुरस्कार 2022 मध्ये हे कलाकार करतील सादर परफॉर्मन्स-

यंदा शाहीद कपूर, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, सारा अली खान, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार, नोरा फतेही हे कलाकार आपली कला सादर करतील. अनन्या पांडे आयफा अवॉर्ड्स 2022 मध्ये लाइव्ह स्टेज परफॉर्मन्समध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय देवी श्री प्रसाद, तनिष्क बागची, गुरू रंधावा, हनी सिंग, नेहा कक्कर, ध्वनी भानुशाली, झहरा एस खान, ध्वनी भानुशाली आणि असीस कौर देखील परफॉर्मन्स करणार आहेत. दरम्यान, येस बेटाचा भाग असलेल्या इतिहाद एरिना येथे सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग- अबू धाबी आणि मिरल यांच्या सहकार्याने आयफा पुरस्कार सोहळा आयोजित केला जाईल.