Rachel White (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र सह संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच आणखी एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. ‘उंगली’आणि ‘हर हर ब्योमकेशी’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रेचल व्हाइट (Rachel White) हीने कोरोनाची चाचणी करुन घेतली असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. मला लवकर बरे व्हायचे आहे. त्यामुळे प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, अशीही तिने पोस्ट केली आहे. दरम्यान, रेचलने पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. सध्या सिनेसृष्टीतील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतच बिग बी आणि अभिषेक बच्चन यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. तर, अनुपम खेर यांच्या आईला आणि कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना करोना झाल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनातून सुटका व्हावी यासाठी उज्जैन येथे पूजेचे आयोजन, पहा फोटो

रेचल व्हाइट हिचे ट्विट-

कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनावर अद्याप कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध नसल्याने नागिरकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.