आय हेट लव्ह स्टोरीज (I Hate Love Stories), ग्रँड मस्ती (Grand Masti) या सारख्या सिनेमातून तर खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi), नच बलिये (Nach Baliye) सारख्या रिऍलिटी शोज मधून समोर आलेली अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाह (Bruna Abdullah) हिला अलीकडेच कन्यारत्न प्राप्त झाले. यानंतर तिने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवरून आपल्या बाळाचा फोटो शेअर करत मुलीचे नाव इसाबेल ठेवल्याचे सांगितले होते. नुकतेच तिने या बाळाला जन्म देण्याचा अनुभव देखील आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. साधारणतः डिलिव्हरीचा अनुभव म्हणून ऐकल्या जाणाऱ्या किस्स्यांपेक्षा ब्रुनाने सांगितलेला अनुभव नक्कीच वेगळा आहे, याचे कारण म्हणजे ब्रुनाने चक्क आपल्या मुलीला वॉटर डिलिव्हरी (Water Delivery) रूपात पाण्यामध्ये जन्म दिला आहे.
ब्रुनाच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये तिने आपल्या बाळाचा जन्म होताना संपूर्ण नैसर्गिक प्रक्रिया असावी तिच्यावर कोणत्याही औषधांचा मारा होऊ नये अशी इच्छा असल्याने आपण वॉटर डिलिव्हरीचा पर्याय निवडला असे सांगितले आहे. गरोदर राहता क्षणीच आपण हा नैसर्गिक प्रसूतीचा निर्णय घेतला होता त्यानुसार स्वतःच्या शरीराला व मेंदूला तयार करण्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती. मी वेळोवेळी आहार घेत होते, व्यायाम करत होते, त्यामुळे हा प्रवास मी खूप काटेकोरपणे पार केला. माझी अशी इच्छा होती कि माझ्या बाळाचा जन्म होताना माझी जवळची माणसे सोबत असावीत, चार तासांहून अधिक वेळ प्रसूती वेदना होऊ नयेत आणि शनिवारी मी बाळा जन्म द्यावा, सुदैवाने या साऱ्या गोष्टी मला मिळाल्या. याशिवाय जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा काहीच क्षणात मी देखील शुद्धीवर आले होते, त्यामुळे जन्मानंतरचे सुरुवातीचे काही क्षण मला माझ्या डोळ्यांनी अनुभवता आले असा आनंद ब्रुनाने व्यक्त केला.
ब्रुना अब्दुल्लाह इंस्टाग्राम पोस्ट
ब्रुनाने मागील वर्षी गरोदर राहताच 25जुलै रोजी आपला बॉयफ्रेंड एलन फ्रेजर सोबत साखरपुडा केला तसेच यंदा मे महिन्यात दोघांनी लग्नगाठ बांधली.
दरम्यान, ब्रुनाचा हा अनुभव ऐकून नेटकाऱ्यानी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तसेच आपल्या बाळाच्या स्वागतासाठी नवमाता करत असणाऱ्या प्रयत्नाची देखील वाहवा होत आहे. लक्षात घ्या हा अनुभव ऐकून तुम्हालाही असे काही करायची इच्छा असेल तर त्याआधी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे.