Fighter New Movie: पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसण्यासाठी हृतिक आणि दीपिका सज्ज, 'फायटर'चे चित्रिकरण सुरू
Hrithik Roshan And Deepika Padukone (Photo Credit - Facebook)

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही स्टार्स एकत्र काम करत असल्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा सुपरस्टार हृतिकचा वाढदिवस होता. हृतिकच्या वाढदिवशी 'फायटर' (Fighter) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नंतर सोशल मीडियावर (Social Media) याची खूप चर्चा झाली, तेव्हापासून हृतिकचे चाहतेही या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी, हृतिक-दीपिकाच्या (Hrithik And Deepika) चाहत्यांना चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे, हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे तसेच या चित्रपटाच्या चित्रिकरणाल सुरवातही झाल्याचे वृत्त आहे.

हृतिक आणि दीपिका स्वतःवर खूप मेहनत घेत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, फायटर हा चित्रपट जूनमध्ये फ्लोरवर जाईल. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 'दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन 2022 च्या जून महिन्यातच फ्लोरवर येणार आहेत. अशा परिस्थितीत हृतिक आणि दीपिका स्वतःवर खूप मेहनत घेत आहेत, कारण हा एक अॅक्शन चित्रपट असेल. अशा परिस्थितीत या दोन्ही कलाकारांना या चित्रपटात त्यांच्या उत्तम शरीरयष्टीने हजेरी लावायची आहे. लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्यानंतर आता या चित्रपटाबाबत अशी योजना आहे की जगभरातील सर्वोत्तम लोकेशन्सवर 'फायटर'चे चित्रिकरण केले जाईल. कोविडमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबले होते. (हे ही वाचा Tehran: जॉन अब्राहम पुन्हा दिसणार अॅक्शन अवतारात, शेअर केले त्याच्या नवीन चित्रपट 'तेहरान'चे पोस्टर)

दीपिका आणि हृतिकशिवाय या चित्रपटात अनिल कपूर 

वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका व्यतिरिक्त अनिल कपूर देखील फायटर चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये 26 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. हृतिक रोशनचा चित्रपट फायटर जॉन अब्राहमच्या आगामी 'तेहरान' चित्रपटाशी टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे. फायटरच्या घोषणेपासून दीपिका आणि हृतिकच्या जोडीची तुलना टॉम क्रूझ आणि अँजेलिना जोली यांच्या जोडीशी केली जात आहे. चित्रपटाच्या कलाकारांबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, यावर दीपिका पदुकोण म्हणाली की, तिची तुलना इतर कोणत्याही जोडीशी करू नये.

नुकतीच दीपिका पदुकोण गेहराइया या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील दीपिकाचा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांचे होश उडाले. त्याचवेळी, दीपिकाच्या फायटरबद्दल अशी आशाही व्यक्त केली जात आहे की या चित्रपटातही अभिनेत्री काहीतरी नावीन्य आणेल.