Tehran: जॉन अब्राहम पुन्हा दिसणार अॅक्शन अवतारात, शेअर केले त्याच्या नवीन चित्रपट 'तेहरान'चे पोस्टर

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. पोस्टर पाहता जॉन यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी लढताना दिसणार असल्याचे दिसते. हा चित्रपट फुल अ‍ॅक्शन असणार असल्याची माहिती खुद्द जॉननेच दिली आहे.

Tehran: जॉन अब्राहम पुन्हा दिसणार अॅक्शन अवतारात, शेअर केले त्याच्या नवीन चित्रपट 'तेहरान'चे पोस्टर
Tehran Movie (Photo Credit - Insta)

बॉलिवूडचा अॅक्शन किंग जॉन अब्राहम (Johan Abraham) सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्शन चित्रपट (Action Movie) करताना दिसतो. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या 'Attack' या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांना खूप आवडले आहे. जॉनचा नवा अवतार सर्वांनाच पाहायला मिळत आहे. दरम्यान, जॉनने आणखी एक धमाका केला आहे. जॉनने त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे. 'तेहरान' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात जॉनही अॅक्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. पोस्टर पाहता जॉन यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी लढताना दिसणार असल्याचे दिसते. हा चित्रपट फुल अ‍ॅक्शन असणार असल्याची माहिती खुद्द जॉननेच दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2022 07:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).