
Laxmi Agarwal Gets Teary- Eyed: लक्ष्मी अग्रवालने तिच्या अॅसिड अटॅकच्या अस्तित्वाची कहाणी सांगणार्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असलेल्या प्रत्येक सीन दरम्यान हजेरी लावली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटात लक्ष्मीची कथा दीपिका पदुकोण आपल्या अभिनयातून साकारत आह. लक्ष्मीच्या आयुष्यातील कठीण प्रसंग जेव्हा दीपिकाने तिच्या उपस्थितीत पुन्हा जिवंत केली, तेव्हा एक क्षण असा होता की संपूर्ण आयुष्य लक्ष्मी स्वतःलाच तिच्या रूपात पाहत होती.
लक्ष्मीच्या खऱ्या घरात शूटिंग करण्याऐवजी टीमने तिच्या घराचा एक देखावा नोएडामध्ये साकारला होता. “आम्ही तिच्या खऱ्या घरासारखे घर केले," असं प्रॉडक्शन डिझायनर सुब्रत चक्रवर्ती यांनी सांगितलं. या सेटवरूनच ती भेट दिली आणि खूपच भावनिक झाली. “जेव्हा लक्ष्मी पहिल्यांदा या सेटवर आली तेव्हा तिला स्वतःच्या घरी परत आल्यासारखं वाटलं आणि ती रडू लागली. ती अत्यंत उदास आणि भावनिक झाली, ”ते म्हणतात.
दरम्यान, छपाक सिनेमा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा भट्ट यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती मेघना गुलजार यांनी घेतली होती. त्यामुळेच भट्ट यांना चित्रपटात श्रेय देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने निर्माता मेघना गुलजार (Meghna Gulzar) यांना दिले होते. परंतु, असे न केल्यास 15 जानेवारीनंतर हा चित्रपट दाखवता येणार नाही, असा न्यायालयाने आदेश दिला आहे.