Happy Birthday Gulzar: सम्पूर्ण सिंह कालरा म्हणजेच गुलजार (Gulzar) यांचा आज (18 ऑगस्ट) 87 वा वाढदिवस आहे. हिंदी साहित्यापासून बॉलिवूडपर्यंत त्यांनी केलेल्या कामाला तोड नाही. त्यांच्या कार्याला शब्दांत मांडणं कठीण आहे. गुलजारांच्या शायर्या कधी मनाला भिडून आनंद देतात तर कधी वास्तवाचं दर्शन घडवतात. मोजक्या शब्दांत जीवनाचा गर्भितार्थ मांडणं ही गुलजारांची हातोटी आहे. बॉलिवूडमध्येही गुलजार यांनी गीतकार, फिल्ममेकर म्हणून मोलाचं काम केले आहे. Gulzar Birthday Special: गुलजार यांच्या 'या' गाण्याला आर.डी.बर्मननी नकार दिल्यावर, आशा भोसले यांनी बनवली चाल; 'असे' तयार झाले अनेक पुरस्कारप्राप्त गीत.
बंदिनी सिनेमामधून बॉलिवूड मध्ये संगीतकार एस डी बर्मन यांच्यासोबत त्यांनी गीतकार म्हणून कामाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 'तलवारीपेक्षा लेखणी धारदार असते' ही उक्ती आपल्याला ठाऊकच आहे आणि याचं जीवंत उदाहरण म्हणजे गुलजार आहेत. गुलजार यांच्या लेखणीतून उमटलेली प्रत्येक कलाकृती आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जाते मग आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनीच लिहलेले हे काही विचार पहा.
गुलजार यांचे विचार
आज की रात यू थमी सी है
आज फिर आपकी कमी सी है
वो चीझ जिसे दिल केहते है
हम भूल गये है रख हे कही
जब भी दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है
कोई वादा नही किया लेकीन क्यू तेरा इंतजार रहता है
तकलीफ खुद ही कम हो गयी
जब अपनो से उम्मीद कम हो गयी
कौन केहता है हम झूठ नही बोलते
एक बार खैरियत तो पूछ के देखीए
मौत तू एक कविता है
एक कविता का वादा है
एक दिन मिलेगी मुझे
लगता है आज जिंदगी कुछ खफा है
चलिए छोडीए कौनसी पहिली दफा है
गुलजार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना सरकार कडून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्म भूषण या दोन मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्लमडॉग मिलेनिअर सिनेमातील "जय हो" या गीताच्या लेखनासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे.