देशातील परंम सुंदरी, निळ्या डोळ्यांची जादू असणारी परी अशी ओळख असलेली अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) आज वाढदिवस आहे. जगभरातून ऐश्वर्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लाखो दिल की धडकन असलेली ऐश्वर्या आज ४९ वर्षांची झाली असुन आज ५० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तरी आजही ती एका अप्सरे प्रमाणेचं भासते असे कमेंट्स (Comments) तिचे चाहते तिच्या सोशल मिडीयावर (Social Media) करीत आहेत. रीता फारिया (Reita Faria) नंतर ऐश्वर्याने भारताची दुसरी मिस वर्ल्ड होण्याचा बहुमान मिळवला आहे. तरी ऐश्वर्या आजही मोठ्या पर्दावर बघण्याची उत्सुकता असते. ऐश्वर्या रॉय ही सध्या बच्चन घराण्याची सुन, अभिनेता अभिषेक बच्चनची पत्नी (Abhishek Bachchan) आणि आराध्या बच्चनची (Aradhya Bachchan) आई आहे. एक स्त्री म्हणून ऐश्वर्या कायमचं सगळ्या भुमिका उत्तम बजावताना दिसते.
तिच्या ऑन-स्क्रीन उपस्थितीपासून (On Screen Presence) ते तिच्या रेड कार्पेट (Red Carpet) दिसण्यापर्यंत, ऐश्वर्यापासून नजर हटवणे अवघडचं. ऐश्वर्याने फ्रेंच रिव्हिएरावर गेली अनेक वर्षे राज्य केले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ऐश्वर्या 2002 मध्ये आलेल्या देवदास (Devdas) चित्रपटासाठी कान्सच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदा दिसली होती. (हे ही वाचा:-लवकरच Kangana Ranaut ची होऊ शकते राजकारणात एन्ट्री; व्यक्ती केली 2024 ची निवडणूक लढवण्याची इच्छा)
ऐश्वर्याने बॉलिवूड (Bollywood) मधील मोठमोठे सिनेमे गाजवले आहेत. विविध नामवंत कलाकारांबरोबर काम केले आहेत. तसेच विविध बाबींमध्ये ऐश्वर्याने भारताचं नेतृत्व केलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनचे अनेक फोटो भुरळ घालणारे आहेत. तरी ऐश्वर्याचे फोटोज सोशल मिडीयावर कायमचं ट्रेण्ड होताना दिसत आहे.