Gunjan Saxena Trailer: जान्हवी कपूर चा चित्रपट 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' चा ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख खान ने व्हिडिओ शेअर करून दिल्या शुभेच्छा
गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल (Photo Credits: YouTube)

Gunjan Saxena: The Kargil Girl Trailer: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) चा चित्रपट 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' (Gunjan Saxena – The Kargil Girl) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर हिने भारतीय वायुसेना दलाची (Indian Air Force) वैमानिक गुंजन यांची भूमिका साकारली आहे. गुंजनने 1999 मध्ये कारगिल युद्धामध्ये (Kargil War) महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी या चित्रपटचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरती वाट पाहत होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांने म्हटलं आहे की, 'गुंजन सक्सेना ही भारतातील वायू दलातील पहिल्या महिला अधिकाऱ्याची कहाणी आहे. या प्रेरणादायक चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.' (हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कडक भूमिका; म्हणाले या प्रकरणात बिहार आणि महाराष्ट्रामध्ये भांडणं लावू नका पुरावे असतील तर आम्हाला आणून द्या)

सध्या कोरोना संकटामुळे देशभरातील सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे अनेक निर्माता आणि प्रोडक्शन कंपन्या चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लेटफॉर्मचा पर्याय निवडत आहेत. जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' हा चित्रपट देखील 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. तर झी स्टुडिओज आणि धर्मा प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असून पंकज त्रिपाठी आणि विनीत कुमार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.