Good Newwz Trailer: 'Sperm' ची अदलाबदली, 'Pregnancy' ड्रामा दाखवत खळखळून हसवणारा गुड न्यूज सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; अक्षय-करीना, दिलजीत-कियाराच्या जोडीने घातलाय धुमाकूळ (Watch Video)
Good Newwz (Photo Credits: YouTube)

अक्षय कुमार (Akshay Kumar), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), कियारा अडवाणी (Kiara Adwani), दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) या चौकटीची सिल्व्हर स्क्रीनवरील धम्माल मस्ती घेऊन गुड न्यूज (Good Newwz)  या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये तब्बल नऊ वर्षांनी अक्षय-करिना एकत्र पडद्यावर दिसणार आहेत तर आणि कबीर सिंग (Kabir Singh) नंतर एका अगदी वेगळ्या ढंगात कियारा प्रेक्षकांना दिसून येणार आहे. ट्रेलर वरून सिनेमाचा थोडक्यात अंदाज घ्याचा झाल्यास , IVF तंत्रज्ञानाची मदत घेत प्रेग्नन्सीचा मार्ग निवडणारे हे दोन कपल्स आणि सारख्याच आडनावामुळे त्यांच्या स्पर्म्सच्या बाबतीत झालेली अदलाबदल परिणामी होणारा गोंधळ अशा कथानकावर सिनेमा आधारित असणार आहे.

अक्षय-करिना आणि कियारा-दिलजीत हे दोन कपल्स IVF तंत्रज्ञानासाठी एकाच हॉस्पिटल मध्ये एकाच डॉक्टर कडे येतात. योगायोग असा की या दोन्ही दोन्ही जोडप्याचं आडनाव एकच असतं. डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांच्या स्पर्मची अदलाबदल होते आणि त्यानंतर याचं मूल त्याच्याकडे आणि त्याचं मूल याच्याकडे अशी परिस्थिती होते. आपापल्या मुलाचा गरोदरपणात सांभाळ करण्यासाठी हे दोघे एकाच बिल्डिंग मध्ये राहायला लागतात. यानंतर पुढे काय होणार ? हा गोंधळ सुटणार का? या सगळ्याची उत्तरं सिनेमागृहातच मिळणार आहेत. (बेबी बंप दिसूनही अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नंट नाही; जाणून घ्या Viral फोटोमागचे सत्य)

Good Newwz Trailer

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं ज्यात अक्षय आणि दिलजीत दोन गरोदर बायकांमध्ये मध्ये अडकलेले दिसून आले होते. यावरून प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलर वरून थोडी थंडावली आहे. कॉमेडी कथानकाच्या मागे लागताना कुठेतरी लॉजिक मागे सारलं असलं तरी एंटरटेनमेंट करण्यात सिनेमा यशस्वी होऊ शकतो. धर्मा प्रोडक्शन निर्मित आणि राज मेहता दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 27 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.