Go Goa Gone 2 Poster Out: गो गोवा गॉन चा सिक्वेल मार्च 2021 मध्ये होणार प्रदर्शित
Go Goa Gone 2 Poster (Photo Credits: Twitter)

Go Goa Gone 2 Release Date: गो गोवा गॉन या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच झॉम्बी कॉमेडी पाहायला मिळाली होती.  प्रेक्षकांनी हा चित्रपट खूप एन्जॉय केला होता. आता मात्र या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच गो गोवा गॉन या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. 2013 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता तर 2021 मध्ये गो गोवा गॉन 2 पाहायला मिळणार आहे.

आज या चित्रपटाचा पहिलाच पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता निश्चित झालं आहे की गो गोवा गॉनचा पार्ट 2 मार्च 2021 मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे.

मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर एक ट्विट करण्यात आलं असून, त्यात लिहिलं आहे की, “एखादा प्रयत्न करू शकतो, पण या ट्रिपमधून तुम्ही कधीच सुटू शकत नाही! गो गोवा गॉनच्या क्रेझी सिक्वेलसाठी स्वतःला तयार करा. कारण मार्च 2021 मध्ये रिलीज होणार आहे गो गोवा गोन 2 हा सर्वोत्कृष्ट "झोम-कॉम"! "

Gangubai Kathiawadi First Look: गँगस्टरच्या रुपातील अभिनेत्री आलिया भट्ट हिचा 'गंगूबाई काठियावाड़ी' मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

"2013 पासूनचा हा प्रवास खूपच चांगला झाला आहे आणि मी खूप उत्सुक आहे की आम्ही परत या क्रेझी प्रवासासह परत आलो आहोत. गो गोवा गॉनने बर्‍याच गोष्टींना नव्याने परिभाषा दिली आणि आम्ही ते पुन्हा करण्यास तयार आहोत. या चित्रपटाची सर्व पात्रं आजही आपल्या मनात आहेत. आणि आता त्यांना पुन्हा जिवंत करण्यास आम्ही तयार आहोत," असे मॅडडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजन यांनी ट्विट केले आहे.

2013 गो गोवा गॉन या झॉम्बी कॉमेडीचे दिग्दर्शन राज आणि डी. के. यांनी केले होते. या चित्रपटात सैफ अली खान, कुणाल केम्मू, वीर दास, पूजा गुप्ता आणि आनंद तिवारी हे प्रमुख भूमिकेत होते.