बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) लवकरच 83 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर दुसरीकडे दीपिका पदुकोण या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 83 चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दीपिका आणि रणवीर दिग्दर्शक कबीर खानसोबत दुबईत आहेत.
या ठिकाणी जगातील सर्वात उंच टॉवर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) '83' ची झलक दाखवली गेली. तो खास क्षण अनुभवण्यासाठी रणवीर आणि दीपिका तिथे उपस्थित होते. व्हायरल भियानीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रणवीर-दीपिकाच्या काही फोटोंचा कोलाज बनवण्यात आला आहे, त्याचवेळी बुर्ज खलिफावर 83 चा मोंटेज सुरू असल्याचे दिसत आहे. हे दृश्य पाहून रणवीर आणि दीपिका खूप खूश असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
दिग्दर्शक कबीर खान, त्यांची पत्नी मिनी माथूर आणि क्रिकेट जगतातील दिग्गज व्यक्तीमत्व कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ हेही या खास प्रसंगी उपस्थित होते. रणवीर सिंगच्या '83' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. 1983 च्या विश्वचषक विजयाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. (हेही वाचा: अक्षय कुमार याचे वर्तन पाहून नेटकरी खुश, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)
View this post on Instagram
माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विश्वचषक कसा जिंकला हे '83' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 24 डिसेंबरला तेलुगु, कन्नड, तामिळ, हिंदी आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.