Anurag Kashyap Tweet About Gangs Of Wasseypur (Photo Credits : Youtube)

परिकथेच्या विश्वात नेणाऱ्या बॉलिवूड (Bollywood)  सिनेमांमध्ये, सात वर्षांपूर्वी उत्तरेकडील शिवराळ भाषेतील गँग्स ऑफ वासेपूर (Gangs Of Wasseypur) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकला, आणि अवघ्या काहीच दिवसात बॉलिवूड प्रेमींपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं.या सिनेमा मुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)  याच्या करिअरला चांगलाच पिकपॉईंट मिळाला होता. मात्र आता अनुरागने या सिनेमाला आपल्या करिअरला लागलेली साडेसाती म्हणत 2019 च्या अंतापर्यंत तरी त्याचा प्रभाव संपावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काल या सिनेमाला प्रदर्शित होऊन सात वर्षे पूर्ण झाली होती त्या निमित्ताने अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत #7years #gangsofwasseypur हे हॅशटॅग वापरले होते. त्यातील एका ट्विट ला उत्तर देताना अनुरागने हे विधान केले आहे. "गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा मी सात वर्षांपूर्वी केला आणि माझ्या आयुष्याची बरबादी झाली असे म्हंटले होते. यापुढे लिहिताना "मी हा सिनेमा काय बनवला लोकांना आता माझ्याकडून अशाच पद्धतीच्या सिनेमांची अपेक्षा आहे. कितीतरी वर्ष मी या अपेक्षेपासून दूर पळण्याचा प्रयत्न करूनही मला अपयशच हाती येत आहे असे म्हणत अनुरागने आता ही साडेसाती निदान 2019 च्या अंती तरी संपावी" अशी आशा व्यक्त केली होती.

अनुराग कश्यप ट्विट

हे ही वाचा - अनुराग कश्यप याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा देत मुलीच्या सुरक्षिततेसाठी विचारला 'हा' सवाल

दरम्यान, गँग्स ऑफ वासेपूरच्या दोन भागांनंतर आता चाहत्यांना तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. अनुरागने या ट्विट मध्ये 2019 च्या शेवटी असा उल्लेख केल्यामुळे काही जण हा तिसरा भाग यंदाचं प्रदर्शित होईल असा तर्क लावत आहेत. या सिनेमाच्या आधीच्या दोन भागांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यातील प्रमुख पात्र नवाझुद्दीन सिद्दीकी, पियुष मिश्रा, रिचा चड्ढा, हुमा कुरेशी यांच्या अभिनयाने झारखंड मधील वासेपूर गावच्या आसपास घडणारी सत्य परिस्थिती दाखवण्यात आली होती.