
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपला प्रचंड यश मिळाले असून मोदी सरकारवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या दरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यप याने देखील मोदी सरकारला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्याचवेळी अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने मोदींना एक प्रश्न विचारला आहे. माझ्या मुलीला धमकवणाऱ्या तुमच्या समर्थकांना कसे तोंड द्यायचे, असा प्रश्न अनुराग कश्यप याने ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.
मुलीला आलेल्या धमकीच्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने मोदींना हा सवाल केला आहे.
अनुराग याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "प्रिय नरेंद्र मोदी सर, निवडणूकीतील तुमच्या विजयासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या विजयाचा आनंद माझ्या मुलीला अशाप्रकारे धमक्या देऊन साजरा करणाऱ्या तुमच्या समर्थकांना मी कसे तोंड देऊ सांगा."
अनुराग कश्यप याचे ट्विट:

लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आले आहे. भाजपच्या या प्रचंड विजयावर बॉलिवूडच्या अनुपम खेर, रितेश देशमुख, एकता कपूर, परेश रावल आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक स्टार्सने मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.