#MeToo मोहिमेत माजी मिस इंडिया निहारिका सिंगची देखील कहाणी,  नवाझुद्दीन सिद्दीकी, भूषण कुमार यांच्यावर आरोप
नवाजुद्दीन (Photo Credit: File Image)

हॉलिवूडपासून सुरु झालेलं MeToo चं वादळ आणि बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रापर्यंत पोहचलं आहे. या meToo मोहिमेमुळे  झगमगत्या दुनियेतील अनेक कलाकारांचे खरे रूप बाहेर येत आहे. यापूर्वी मोहिमेमध्ये नाना पाटेकर, साजिद खान, आलोक नाथ अशा बड्या कलाकारांची नावं पुढे आली आहेत. माजी मिस इंडिया निहारिक सिंग हिने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. पत्रकार संध्या मेननने ट्विटरच्या माध्यमातून एक कहाणी शेअर केली आहे.

संध्याने शेअर केलेल्या नुसार, निहारिकाने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि निर्माता भूषण कुमार यांच्या वर आरोप लावले आहे. नवाझुद्दीन आणि निहारिकाची भेट ‘मिस लव्हली’ चित्रपटाच्या सेटवर झाली. नवाझ निहारिका जवळच राहत असल्याने एके दिवशी तिने ब्रेकफास्टचं आमंत्रण नवाझला दिलं होतं. त्यावेळेस त्याने निहारिकाला जवळ घेत जबरदस्तीने किस केल्याचा प्रयत्न झाल्याचे निहारिकाने सांगितले आहे. तसेच या प्रसंगाच्या वेळेस धडपड करून नवाझच्या मिठीतून सुटल्याचं निहारिकाने म्हटलं आहे.

 

नवाझउद्दीन प्रमाणेच निर्माता भूषण कुमारने ‘अ न्यू लव्ह इश्टोरी’ या सिनेमासाठी ऑफिसमध्ये बोलावले होते. मात्र त्यावेळेसही भेटीनंतर डेटवर जाऊ असा मेसेज केल्याचा आरोप निहारिकाने भूषण कुमारवर केला आहे. गेल्या वर्षी नवाजुद्दीनचं आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आल. त्याच्या आत्मचरित्रात त्याने निहारिकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं लिहिलं होतं. निहारिकाची परवानगी न घेता आत्मचरित्रात उल्लेख केल्याने नवाजला अखेरीस त्याचं प्रकाशन थांबवावं लागलं होतं. नवाझुद्दीन मुलींशी खोटं बोलून त्यांना फसवत असल्याचं लक्षात आल्यानंतर नवाझ सोबतचे संबंध तोडल्याचेही निहारिकाने म्हटलं आहे.