Lock Upp 2: कंगना राणौत (Kangana Ranaut) चा वादग्रस्त रिअॅलिटी शो लॉक अपचा सीझन 2 (Lock Upp 2) लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. जेल-थीम असलेल्या या शोमध्ये दिसणारे स्पर्धक कैदी असून त्यांच्यावर कॅमेरे आणि जेलर्सद्वारे 24 तास नजर ठेवली जाते. शोची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सीझन 2 चे स्वरूप टेलिकास्ट होण्यापूर्वीच लीक झाले आहे.
लॉक अप 2 बाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु शोचे जेलर, स्पर्धक आणि वॉर्डन यांच्याबद्दल सतत अपडेट्स मिळत आहेत. लॉक अप सीझन 1 मध्ये करण कुंद्राने जेलरची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी अशी अटकळ पसरली होती की, सीझन 2 मध्ये करण नव्हे तर अभिनेत्री रुबिना दिलीक जेलरची भूमिका साकारू शकते. तथापि, झूमशी बोलताना रुबीनाने स्पष्ट केले की ती लॉक अप 2 मध्ये करण कुंद्राची जागा घेत नाहीये.
ताज्या अपडेटनुसार, निर्माते यावर्षी एक नव्हे तर दोन जेलर बनवण्याचा विचार करत आहेत. बिग बॉस 16 चे टीआरपी रेकॉर्ड तोडण्यासाठी, निर्माते करण कुंद्रा आणि रुबिना दिलीक या दोघांना लॉक अप 2 चे जेलर म्हणून ऑनबोर्ड करू शकतात. या अफवा खऱ्या ठरल्या तर हा शो मोठा धमाका ठरणार आहे. आता करण आणि रुबिना जेलरची ड्युटी कशी पार पाडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (हेही वाचा - Nawazuddin Siddiqui Rape Case: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीविरुद्ध पत्नी Aaliya Siddiqui ने दाखल केला बलात्काराचा गुन्हा; समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch))
यापूर्वी अशी बातमी आली होती की, शोमध्ये रुबिना दिलीक आणि करण हिना खान वॉर्डनची भूमिका साकारणार आहेत. हे दोघेही स्पर्धकांवर लक्ष ठेवण्याचे काम करतील. तूर्तास, जोपर्यंत हा शो येत नाही, तोपर्यंत अशी अटकळ सुरूच राहणार आहेत.