Forbes India 2019 Celebrity 100: आमिर खान हे टॉप 10 मधून बाहेर; पाहा या यादीत कोणाला मिळाले कोणते स्थान
Aamir Khan, Shahrukh Khan, Salman Khan | (facebook , PTI and getty)

Forbes India 2019 Celebrity 100: तीन सुपरस्टार खान- शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांनी बॉलिवूडवर अनेक दशके एकत्र राज्य केले आहे. परंतु, हे तिघं Forbes India 2019 च्या टॉप 100 सेलिब्रिटींच्या यादीत एकत्र राज्य करू शकलेले नाहीत. Forbes India 2019 मासिकाने आज 2019 मधील टॉप 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. परंतु, या नावांच्या यादीत शॉकिंग बदल पाहायला मिळाले आहेत. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अव्वल स्थानावर आहे. तसेच नेहमी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सलमान खानला त्याने मागे टाकलं आहे. दबंग 3 स्टारने (Dabangg 3) यावेळी 229.25 कोटी रुपये कामे करत तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानले आहे.

2018 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या टॉप 100 यादीत शाहरुखचं नाव टॉप 20 मध्ये होतं. परंतु, आता शाहरुखने पहिल्या 10 च्या यादीत स्थान मिळवले आहे. झीरो स्टारने यादीत सहावे स्थाना पटकावले आहे. त्याला अक्षय कुमार, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि एमएस धोनीच्या यांच्या नावांनंतरचे स्थान मिळाले आहे.

रणवीर सिंग याच्या 83 पासून आमीर खान च्या लालसिंग चड्डापर्यंत, 2020 मध्ये प्रदर्शित होणारे हे आहेत 10 बहुप्रतीक्षित बॉलीवूड चित्रपट

दरम्यान, आमिरला यावर्षीच्या पहिल्या दहा स्थानातून बाहेर पडावे लागले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आमिरने 6 व्या स्थानावर तळ ठोकला होता. या वर्षी मात्र त्याचे नाव मागे पडून 15 व्या स्थानावर पोहोचले आहे.