Mithun Chakraborty's Son Mahaakshay Accused of Rape: मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षयवर बलात्कार-गर्भपात केल्याचा आरोप; दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद
Mahaakshay and Mithun Chakraborty's (PC - Twitter)

Mithun Chakraborty's Son Mahaakshay Accused of Rape: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty's) यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती (Mahaakshay Chakraborty) मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्याविरूद्ध मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात (Oshiwara Police Station) बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या एका अभिनेत्री-मॉडेलने हा आरोप केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पीडित अभिनेत्रीने आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, ती आणि महाक्षय 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. 2015 मध्ये महाक्षयने पीडितेला घरी बोलावले आणि सॉफ्ट ड्रिंकमधून औषध दिलं. महाक्षयाने पीडित मुलीशी तिच्या संमतीविना शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिला लग्नाची मागणी घातली. लग्नाचे वचन देऊन महाक्षयाने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. (हेही वाचा - Kangana Ranaut वर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश)

दरम्यान, महाक्षय चक्रवर्ती यांचे तब्बल 4 वर्षे पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच महाक्षयने पीडितेचा मानसिक छळही केला. एफआयआरनुसार, पीडित मुलगी गरोदर राहिली तेव्हा महाक्षयने तिच्यावर जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. जेव्हा पीडित मुलगी यासाठी सहमत झाली नाही, तेव्हा त्याने तिला गर्भपाताची औषधे दिली. ही औषधे गर्भपाताची होती, हे पीडितेला माहित नव्हते.

याशिवाय पीडितेने महाक्षयची आई योगिता बाली यांनी आपल्याला या प्रकरणी धमकावल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे योगिता बाली आणि महाक्षय विरोधोत कलम 376 (2) (एन) (स्त्रीवर वारंवार बलात्कार करणे), 328 (तिला विष किंवा इतर मार्गाने दुखापत करणे), 417 (फसवणूक), 506 (धमकी देणे), 313 ( महिलेच्या संमतीविना गर्भपात) आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.