Filmfare Awards 2020 (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड मधील सर्वात बहुचर्चित फिल्मफेअर अवॉर्ड (Filmfare Awards 2020) नाईट्सचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यंदाचा 65 वा फिल्मफेअर अवॉर्ड हा पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर आयोजित करण्यात आला होता. याचे आयोजन गुवाहाटी येथे करण्यात आले होते. या अवॉर्ड नाईटसाठी बॉलिवूड मधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून त्याची शान वाढवली होती. फिल्मफेअर अवॉर्ड्स आज (16 फेब्रुवारी) टेलिव्हिजनवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

अवॉर्ड सोहळ्याला चारचांद लावण्यासाठी बॉलिवूड कलाकार शुक्रवारीच गुवाहाटी येथे पोहचले होते. यासाठी आलिया भट्ट, रणवीर सिंग, माधुरी दीक्षित, आयुषमान खुराना, विकी कौशल, सारा अली खान यांच्यासह अन्य मंडळी सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित होते. 65 व्या फिल्मफेअर अवॉर्डसाठी नॉमिनेशनबाबत बोलायचे झाल्यास त्यासाठी मिशन मंगल,उरी, छिछोरे आणि गली बॉय यांच्यामध्ये टक्कर होती. परंतु तरीही आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या गली बॉयने फिल्मफेअर अवॉर्डचा मान पटकावत 12 पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. तर जाणून घ्या विजेत्यांची नामांकनांसह लिस्ट.(Oscars 2020: ‘पैरासाइट’ठरला ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट,वॉकिन फीनिक्स बेस्ट अॅक्टर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंग (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट मेल क्रिटिक्स- आयुषमान खुराना (आर्टिकल 15)

सर्वोत्कृष्ट फिमेल क्रिटिक्स-भुमी पेडणेकर आणि तापसी पन्नू (सांड की आंख)

सर्वोत्कृष्ट डेब्यू डायरेक्टर- आदित्य धर (उरी-द सर्जिकल स्ट्राइक)

सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेता- अभिमन्यु दासानी (मर्द को दर्द नही होता)

सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री- अन्यन्या पांडे (स्टुटंड ऑफ द इअर)

सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेता- सिद्धांत चतुर्वेदी (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री- अमृता सुभाष (गली बॉय)सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (फिमेल)- शिल्पा राव (वॉर- घुंगरु)

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (मेल)- अरजित सिंग (कलंक)

सर्वोत्कृष्ट लिरिक्स- डिवाइन आणि अंकुश तिवारी (अपना टाइम आएगा-गली बॉय)

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- शेरी भरदा अॅन्ड विशाल आनंद (वॉर)

सर्वोत्कृष्ट अॅक्शन- पॉल जेनिंग्स, ओह सी यंग, परवेज शेख आणि फ्रॅन्ज स्पिलहॉस (वॉर)

सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी- रेमो डिसूझा (कलंक)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- जय ओजा (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोर- कर्ष काळे आणि द सालवेज ऑडिओ कलेक्टिव (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट एडिटिंग- शिवकुमार वी पणिक्कर (उरी)सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन- विश्वदीप दीपक चॅटर्जी आणि निहार रंजन सामल (उरी)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन- सुजैन कॅपलन मेर्वांजी (वॉर)

सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम- दिव्या गंभीरस निधी गंभीर (सोनचिडिया)

लाइफटाइम अचिव्हमेंट- रमेश सिप्पी

सर्वोत्कृष्ट अभिनेता (शॉर्ट फिल्म)- सारा हाशमी (बेबाक)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (शॉर्ट फिल्म)- राजशे शर्मा (टिंडे)सर्वोत्कृष्ट अॅक्शन (शॉर्ट फिल्म)- शाजिया इकबाल (बेबाक)

बेस्ट नॉन फिक्शन (शॉर्ट फिल्म)- अनंत नारायण महादेवन (विलेज ऑफ अ लॅसर गॉड)

पीपल चॉईस अवॉर्ड (बेस्ट शॉर्ट फिल्म)- रोहिल बापू कांबळे (देशी)

फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन प्रत्येक वर्षाला केले जाते. या पुरस्काराची सुरुवात 1954 पासून झाली. फिल्मफेअर अवॉर्डची घोषणा आणि ज्युरी सदस्यंच्या मतांच्या आधारे करण्यात येते. 21 मार्च 1954 मध्ये झालेल्या फिल्मफेअर अवॉर्डसाठी फक्त 5 पुरस्कार ठेवण्यात आले होते.