
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) नेहमी तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मलायका ही 47 वर्षाची आहे. मात्र, तरीही तिच्या फिटनेसने सर्वांनाच प्रभावित केले आहे. मलायका नेहमी तिच्या फ्रि टाईममध्ये अधिक वेळ जिममध्ये व्यायाम करण्यात घालवते. यामुळे मलायकाचे सोशल मीडियावर सतत फोटो व्हायरल होत असतात. मात्र, नुकताच तिचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यात ती स्पोर्ट्स वेअर घालून जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. परंतु, या फोटोत तिचे स्ट्रेच मार्क्सदेखील (Stretch Marks) दिसत आहे. यावरून ट्रोलर्स आणि तिच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.
मीडिया फोटोग्राफर विरल भयानी यांनी मलायकाचा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी लिहले होते की, मलायका ही जिम वेअरमध्ये आपले स्ट्रेच मार्क्स दाखवण्यात अजिबात संकोच करत नाही. स्ट्रेच मार्क्स हे नैसर्गिक आहे. गरोदरपणानंतर बऱ्याच महिलांमध्ये दिसतात. मात्र, मलायकाच्या स्ट्रेच मार्क्सच्या फोटोवरून सोशल मीडियावर एक नवीन वाद रंगला आहे. हे देखील वाचा- Tandav Controversy: 'तांडव'चे निर्माते व कलाकारांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; अटकेपासून अंतरिम संरक्षण नाकारले

हा फोटो पाहिल्यानंतर इंटरनेटवर एक नवीन प्रकारची चर्चा रंगली. हे फोटो पाहिल्यानंतर बर्याच लोकांनी मलायकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा देत ट्रोलर्सचा समाचार चांगला घेतला आहे.

दरम्यान, मलायकाचा हा फोटो पाहिल्यानंतर ट्रोलर्सने तिला म्हतारी म्हंटले आहे. तर, तिचे चाहते म्हणतात की, या वयातही मलायकाने आपला फिटनेट ठेवला आहे, हे आजच्या तरूणांसाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे.