Punjabi Singer Diljaan Died in Road Accident: पंजाबमधील प्रसिद्ध गायक दिलजान यांचा रस्ते अपघातात मृत्यू; 2 एप्रिल रोजी नवीन गाणे होणार होते प्रदर्शित
Punjabi Singer Diljaan (PC - Facebook)

Punjabi Singer Diljaan Died in Road Accident: प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजान (Singer Diljaan) यांचा रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे 3.45 च्या सुमारास हा अपघात झाला. रात्री उशिरा दिलजान आपल्या गाडीने अमृतसरहून करतारपूरकडे येत होता आणि याच दरम्यान जंडियाला गुरुजवळ हा अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. दिलजान हा करतारपूरचा रहिवासी होता. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरु पुलाजवळील दुभाजकावर दिलजानची कार आदळली. मंगळवारी पहाटे 3:45 वाजता हा अपघात झाला. या अपघातात दिलजानचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिची मिळताचं त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दिलजानचा मृतदेह ताब्यात घेतला. दिलजानचा मृतदेह श्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

जंडियाला गुरु पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यादवंद्र सिंह यांनी सांगितले की, अपघाताचे नेमकी कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंगळवारी पहाटे दिलजान आपल्या कारमधून अमृतसरहून करतारपूरच्या दिशेने जात होता. यावेळी जीटी रोडदरम्यान त्याच्या कारचा वेग जास्त होता. पुलाजवळ पोहोचताच कार अनियंत्रित झाली आणि दुभाजकाला धडकली. त्यामुळे कार पलटी झाली. स्थानिकांनी दिलजानला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यापूर्वीचं त्याचा मृत्यू झाला होता.

दिलजनाचे वडील मदन मडार यांनी सांगितले की, दिलजानचे नवीन गाणे 2 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सोमवारी तो या संदर्भातील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आपल्या महिंद्र केयूडी वाहनातून अमृतसरला गेला. रात्री उशिरा परतत असताना हा अपघात झाला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

सुरक्षेत्र या टीव्ही कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गायन स्पर्धेत दिलजान विजयी झाला होता. यामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. तो देशातील सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये गणला जात होता. दिलजानने आतापर्यंत अनेक उत्तम गाणी गायली आहेत.