
Hot Bikini Photoshoot: अभिनेत्री ईशा गुप्ता हिने 'कमांडो 2' आणि 'बादशाहो' या सारख्या बॉलिवूड चित्रपटांत काम केले आणि तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली. सोशल मीडियावर अत्यंत ऍक्टिव्ह असणारी इशा आता मात्र पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे ते म्हणजे तिच्या नव्या फोटोशूटमुळे. ईशाने अलीकडेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यातील तिचा रेड हॉट बिकिनीमधील लुक फॅन्सना भलताच आवडलेला दिसतोय. अनेक फॅन्सनी त्यावर कमेंट करत ईशाच्या या अदाकारीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
परफेक्ट फॅशन सेन्स असणाऱ्या ईशाने या फोरॅशूट दरम्यान रेड बिकिनी आणि डेनिम जॅकेट अशी स्टाईल ट्राय केली आहे. हा बोल्ड अवतार तिला गडी शोभून दिसत आहे. त्याचसोबत स्मोकी आईज, बीच वेव्ज आणि हूप इअररिंग्ज या सर्वामुळे तिचा हॉट लूक सर्वांच्याच पसंतीस पडला आहे.
पाहा ईशाच्या बिकिनी फोटोशूटची एक झलक,
दरम्यान ईशाची अभिनयातील कारकीर्द पाहता, तिने 2012 साली 'जन्नत 2' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर तिने 'राज 3', 'रुस्तम', 'कमांडो २', 'बादशाहो' या सारख्या एकापेक्षा एक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे ईशाने नुकताच एक हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला ईशाचा हॉट लुक चाहत्यांना खूप भावला होता.