
All About Nikita Gokhale: निकिता गोखले (Nikita Gokhale) हे अगदी मराठमोळं नाव. आज आंतरराष्ट्रीय मॅगझिन, फॅशन वर्ल्ड, बिकिनी इंटरनॅशनल कॉम्पीटीशन आणि सोशल मीडिया यांवरुन अगदी प्रसिद्धी लाटेवर स्वार असलेलं. खरे तर निकिता गोखले (Nikita Gordijn) या नावाला वेगळ्या कोणत्या परिचयाने संबोधित करावे याची गरजच नाही. मुळची विदर्भातील असलेली आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) तालुक्यात जन्माला आलेली ही मुलगी. आपला मोकळाढाकळा स्वभाव आणि बिनधास्त मतं यामुळे अनेकदा चर्चेत येते. त्यासोबतच ती प्लेबॉय (Playboy) या आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी केलेले न्यूड फोटोशूट असो किंवा ‘मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल 2015’ (Miss World Bikini International 2015) स्पर्धेत केलेले भारताचे प्रतिनिधित्व असो, या सर्वच गोष्टींमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. प्रसारमाध्यमांतून बातम्या आणि चर्चेचा विषय झाली. नुकतेच तिचे न्यूड फोटोशूट सोशल (Nikita Gokhale Nude Photoshoot) मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यामुळे ती गुगलवरही सर्च होत आहे. अशा या निकिता गोखले हिचे व्यक्तिगत आयुष्य, करिअर वाद आणि लैंगिक विषयावर तिने मांडलेली मतं याबद्दल बरंच जाणून घेऊ.
सर्वसामान्य कुटुंबात जन्म
निकिता गोखले हे नाव आज आपल्याला जरी प्रसिद्ध, बोल्ड व्यक्तिमत्व वाटत असले तरी, तिची कौटुंबीक पार्श्वभूमी सर्वसामान्यच आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य कुटुंबातूनही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत तिने मारलेली मजल हा प्रवास अनकांसाठी उत्सुकता वाढवणारा ठरतो. भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावात जन्मलेली ही मुलगी वयाच्या 17 व्या वर्षी करिअरच्या शोधात नागपूरला आली.
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ आत्मविश्वास
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ आत्मविश्वास याची जोड या मुलीला बहुदा जन्मताच मिळाली असावी. दिव्य मराठी या वृत्तपत्राने तिच्यावर लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे की, तिची पहिली कमाई होती अवघी 400 रुपये. पुढे तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामामुळे कमाईचे आकडे तिच्यापुढे अगदीच तोकडे वाटू लागले आणि तिची प्रसिद्धी आणि कार्यपद्धती याचे कौतुक होऊ लागले. अर्थात टीका आणि दुषणं हेही तिच्या वाट्याला आलेच. नाही असेही नाही. निकिता हिला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तर तिचे वडील हे एका स्टील वर्कशॉपमध्ये नोकरीला होते. (हेही वाचा, Nude Photo Shoot: मराठी अभिनेत्री, मॉडेल निकिता गोखले न्यूड फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल, पाहा फोटो)
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

शिक्षण आणि करिअर निवड
नागपूर येथील जीएस महाविद्यालयातून निकिताने महाविद्यालयीन शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. पुढे तिने करिअरसाठी मॉडेलिंग, जाहीरात आणि आर्थिक सल्लागार हे क्षेत्र निवडले. आज ही मुलगी निकिता गोखले नावाने सर्व परिचित असली तरी ते तिचे मूळ नाव नव्हे. तिचे दुर्गा गोखले हे खरे नाव आहे. मॉडेलिंग क्षेत्रात स्क्रिनसाठी सोइस्कर म्हणून तिने निकिता हे नाव घेतले. (हेही वाचा, वीणा सेंद्रे: मादक डोळे, गुलाबी हसू, रॅम्पवॉक करणाऱ्या ट्रान्सजेंडरची अनोखी कहाणी)
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

फायनॅन्शिअल अॅडव्हायजर काम
निकिता हिच्या करिअरवर नजर टाकायची तर, तिने दिल्ली येथील एका कंपनीत फायनॅन्शिअल अॅडव्हायजर काम केले. या कंपनीत तिने पंजाब रिजनल हेड म्हणून पाच वर्षे काम केले. पण, केवळ नोकरीवरच ती थांबली नाही. तर, पुढे तिने स्टॉक मार्केट कंपनीची स्थापनाही केली. तिने ही कंपनी नागपूर येथे स्थापन केली. प्राप्त माहितीनुसार या कंपनीचा कारभार तिचा भाऊ पाहात असल्याचे समजते.
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

सेक्स या विषयावर स्पष्ट आणि सडेतोड मतं
निकिता गोखले ही आपल्या स्पष्टोक्तेपणा आणि सडेतोड मंत यांसाठीही चर्चेत असते. खास करुन लैंगिक विषयावरही तिने मनमोकळी मतं व्यक्त केली आहेत. फ्री सेक्स ही संकल्पना बलात्काराच्या घटना कमी करण्यास पूरक ठरेन अशा आशयाचेही विधान निकिताने केले होते. तसेच, दिल्ली येथे एका मार्केटींग कंपनीत काम करत असताना तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्यावर लैंगिक बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करुन तिने खळबळ उडवून दिली होती. आपण तक्रार केल्यावर या अधिकाऱ्याला कंपनीतून काढून टाकले असेही तिने म्हटले होते.
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

वयाच्या 23 व्या वर्षी तिने पहिल्यांदा सेक्स
एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की वयाच्या 23 व्या वर्षी तिने पहिल्यांदा सेक्स केला होता. एका एक्स कंपनीत काम करत असलेल्या आणि आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या तरुणाच्या ती प्रेमात पडली होती. तसेच, या तरुणासोबत आपण शारीरिकरित्याही जवळ आलो होते, असेही तिने सांगितले होते. (हेही वाचा, बलात्कार: अभिनेत्री, मॉडेल पद्म लक्ष्मीकडून तब्बल ३२ वर्षांनी ''त्या' प्रसंगाची वाच्यता; बाळगलेल्या मौनाचाही खुलासा)
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

प्लेबॉय या जगप्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट
प्लेबॉय या जगप्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट करणारी निकिता गोखले ही दुसरी भारतीय मॉडेल आहे. या मासिकासाठी तिने न्यूड फोटोशूट केले आहे. तसेच, या फोटोशूटमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

प्लेबॉय मासिकासाठी मुंबईत फोटोशूट
प्लेबॉय मासिकाचे फोटोग्राफर एरोल फ्रँकलिन यांच्याकडून ऑफर आल्यानंतर तिने हे फोटोशूट केले. मुंबई येथे हे फोटोशूट पार पडले. विशेष म्हणजे फेसबुकवर असलेल्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एरोल फ्रँकलिन आणि निकिता यांची ओळख झाली. या आधी या मासिकासाठी असे फोटोशूट शर्लिन चोप्रा या भारतीय अभिनेत्रीने केले होते. (हेही वाचा, इतका हॉटनेस की, भल्याभल्या अक्टर्सही पडतील फिक्या; मॉडेल Sheeva Rana हिचा Bikini अवतारात Bold तडका)
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

निकिता गोखले व्हिडिओ
निकिता गोखले ही आज इंटरनेट, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया आदी माध्यमांतून प्रचंड कार्यरत असते. nikitagokhale.com नावाची तिची स्वत:ची वेबसाईटही आहे. या वेबसाईटवर तसेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर सेक्सी, हॉट आणि तितक्याच बोल्ड फोटोंचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भडीमार असतो. ही वेबसाईट आणि इन्स्टाग्राम पेज यावर ती मोठ्या प्रमाणावर आपली छायाचित्र अपलोड करत असते. या आधी इन्स्टाग्राम पेजवर तिने #ArtNude हॅशटॅग वापरतही स्वत:चे न्यूड फोटो शेअर केले आहेत. एखाद्या मराठी मुलीने इतक्या बोल्ड आणि बिनधास्तपणे फोटो, मतं व्यक्त करणे हे तसे तुरळकच मानले जात आहे.