'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चित्रपटातील शानदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)
सोनम कपूर आणि राजकुमार राव (फोटो सौजन्य- यु ट्युब)

अनिल कपूर (Anil Kapoor) याचा 1942 मधील चित्रपट 'अ लव्ह स्टोरी' ( 1942: A Love Story) चित्रपटातील गाणे 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे अनिल कपुरच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. सोनम कपूर आणि राजकुमार राव यांच्या आगामी चित्रपट 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' मधील हे टायटल ट्रॅक आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच सोनम कपुर (Sonam Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkummar Rao) एकत्र झळकणार आहेत. तर सोनमच्या सिनेमातील वडीलांची भुमिका खुद्द अनिल कपुरच साकारणार आहे.

या गाणे दर्शन रावल (Darshan Rawal) ह्याने गायले असून गाण्यातील संगीत हे पूर्वीसारखेच कोमल आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल कपूरने या चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करुन यामधील गाणे 8 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे. येत्या 1 फेब्रुवारी, 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हेही वाचा- 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित)

'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' हे गाणे नेहमीच एव्हर ग्रीन मानले जाते. परंतु दर्शन रावल याने रिमेकच्या माध्यमातून या गाण्याला यो्ग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्रेक्षकांना हा चित्रपट पसंदीस येणार का याकडे दिग्दर्शकांचे लक्ष लागून राहिले आहे.