
‘Dus June Kii Raat’ Trailer: 'दस जून की रात' वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिज अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी आणि अभिनेता तुषार कपूर, शान ग्रोवर, मनजीत सचदेव या सारखे कलाकार झळकणार आहे. प्रियंका हीने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ घातली होती. दस जून की रात या वेब सीरिजचा काही दिवसांपासून फर्स्ट लूक समोर आला होता. येत्या ४ ऑगस्ट रोजी ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज जिओ सिनेमा प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (हेही वाचा- 'स्त्री 2' मधील तमन्ना भाटियाचे 'आज की रात' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला)