दुबईकरांनीही जंगी स्वरूपात सेलिब्रेट केली दीपिका पादुकोण - रणवीर सिंगच्या लग्नाची बातमी  (Video)
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग (Photo Credits: Yogen Shah)

काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग या बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडीने त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. 14-15 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्न भारतात होणार की परदेशात ? याबाबत अजूनही खुलासा करण्यात आला नसला तरीही या जोडीचे जगभरातील चाहते लग्नाच्या बातमीने खूष झाले आहे. 'या' कारणामुळे दीपिका आणि रणवीर करणार 15 नोव्हेंबरला लग्न

दुबईमध्येही दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नाच्या बातमीने खास अंदाजात सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. दुबई फाऊंटन हे तेथील लोकप्रिय स्थळ आहे. नियमित हजारो पर्यटक येथे भेट देतात. बॉलिवूड गाण्यांच्या ठेक्यावर येथे फाऊंटनमधील पाणी उडवले जाते. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची घोषणा झाल्यानंतर या फाऊंटनवर ओम शांती ओम या चित्रपटातील एक गाणं वाजवून सेलिब्रेशन करण्यात आले.

सोशल मीडियामध्येही दीपिका आणि रणवीर सिंगच्या बातमीने अनेक चर्चा रंगल्या आहेत. काहींनी रणवीर दीपिकाच्या लग्नाच्या पत्रिकेवरून मीम्स बनवत त्यांची फिरकीदेखील घेतली आहे. दीपिका -रणवीर पाठोपाठ बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रादेखील निक जोनाससोबत 2 डिसेंबरला जोधपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे.